या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या जुन्या लॅपटॉपमध्ये हार्ड डिस्कच्या जागी SSD (Solid State Drive) लावून त्याला फास्ट कसं बनवायचं… व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, सूचना असतील खाली कमेंट करा.
SSD चा वापर का करावा आणि त्याचे फायदे : SSD वापरण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यामुळे मिळणारा वेग. SSD ही HDD पेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करते त्यामुळेच त्याचा उपयोग लवकर पीसी/लॅपटॉप बूट (चालू) करणे यासाठी होतो. जिथे HDD वर एखादा मिनीट जातो त्याच ठिकाणी SSD अगदी काही सेकंदात हे काम पार पडते. एवढेच नव्हे तर आपण इंस्टॉल केलेले अॅप्लिकेशन / गेम्स लवकर चालू होण्यास व परफॉर्मेंस सुधारण्यास SSD चा उपयोग होतो. SSD मध्ये फॉटोशॉप, ऑफिस, मोठे अॅप्स/गेम्स हे HDD च्या तुलनेत खूपच लवकर चालू तर होतातच शिवाय वापर करताना ही वेग वाढण्यास मदत होते.
SSD जोडल्यामुळे आपला जुना लॅपटॉपचा वेग वाढून तो खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आपण नव्या SSD मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल करून हार्ड डिस्क आपला इतर डेटा साठवण्यासाठी वापरणार आहोत.. हे करत असताना हार्ड डिस्कवरील डेटा डिलिट होणार नाही. तो आहे तसाच राहील. हार्ड डिस्कच्या जागी SSD लावून ती जुनी हार्डडिस्क DVD ड्राइवच्या जागी लावणार आहे त्यासाठी Caddy लागेल.
छान माहिती सर
छान माहिती सर