विवोचा पूर्ण डिस्प्ले असलेला नेक्स फोन भारतात सादर!

चीनी कंपनी विवोने त्यांचा फ्लॅगशिप फोन प्रथमच भारतात सादर केला असून विवो नेक्स (Vivo Nex) फोन आता भारतात खरेदी करता येईल. मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये अपेक्स नावाने या फोनची झलक दाखवण्यात आली होती. त्यानंतर हा फोन चीनमध्ये सादर झाला आणि आता भारतात उपलब्ध होतोय. या फोनची भारतातली किंमत ₹४४९९० असेल आणि हा अमॅझॉनवर मिळेल. विवो नेक्स हा सुद्धा मेड इन इंडिया असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बाजू पूर्ण डिस्प्ले हे या फोनच वैशिष्ट्य . अगदी आयफोनला सुद्धा जमलं नाही आयफोनमध्ये नॉच म्हटलं जाणारा थोडासा तरी भाग येतोच.  नॉच जागी असलेला कॅमेरा विवोने थेट मेकॅनिकल पार्टस बसवून फ्रंट कॅमेरा ऑन करताच बाहेर येईल असा बसवला आहे!

Vivo NEX Specs : विवो नेक्स सुविधा 
डिस्प्ले : 6.59″ 2316*1080 FHD+ Super AMOLED Bezelless
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845 Octa Core 2.8 GHz
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB (memory expansion not supported )
बॅटरी : 4000mAh (Li ion) Fast ChargingSupported
Fingerprint Sensor : डिस्प्लेमध्येच फिंगर प्रिंट स्कॅनर (Indisplay Fingerprint)
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.0 ( Android Oreo 8.1 आधारित )
कॅमेरा : 12MP (24 million photosensitive units) + 5MP, 4-Axis OIS Aperture f1.8, f2.4
फ्रंट कॅमेरा : 8MP Aperture f2.0
सेन्सर : Accelerometer, Ambient Light Sensor, Proximity Sensor, E-compass, Gyroscope
इतर : Bluetooth 5, USB 2.0

Vivo NEX | The Future is NEX : https://youtu.be/4ys-VtnsJAQ

Exit mobile version