Nvidia ची नवी RTX 2000 ग्राफिक्स कार्ड मालिका सादर

Nvidia या ग्राफिक्स कार्ड क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या GeForce RTX 2000 मालिकेतील ग्राफिक्स कार्डस सादर केली आहेत. गेम्सकॉम या जर्मनी येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात Nvidia ने त्यांच्या येणार्‍या काळात वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. यापूर्वीच्या लोकप्रिय GTX 1080Ti बाजारातील सर्वोत्तम GPU म्हणजेच ग्राफिक्स कार्डची जागा हे RTX मालिकेतील GPU घेतील! real-time ray-tracing इफेक्ट्स गेमिंग मध्ये जोडण्यासाठी या नव्या कार्डसमध्ये जोड देण्यात आली आहे. Nvidia कडून या रे ट्रेसिंग तंत्राबद्दल जोरात प्रचार सुद्धा केला जातोय.

Nvidia ने आधीच्या कार्डसपेक्षा सहापट कामगिरी करू शकतील असं सांगितलं आहे. Asus, EVGA, Gigabyte, MSI, PNY व Zotac या कंपन्यांकडून RTX 2080 आणि RTX 2080 Ti आजपासून प्रिऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहेत. २० सप्टेंबर पासून प्रत्यक्षात उपलब्ध होतील. RTX 2070 ची किंमत $499, RTX 2080 ची $699 आणि RTX 2080 Ti ची किंमत $999 पासून सुरू होईल. Nvidia या सर्व कार्डसची Founders Editions सुद्धा आणत आहे! यांच्या किंमती पुढील प्रमाणे असतील GeForce RTX 2070 Founders Edition $599, RTX 2080 Founders Edition $799 आणि RTX 2080 Ti Founders Edition $1,199

GeForce RTX – Graphics Reinvented

Exit mobile version