जिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड, जिओफोन २, गिगाटीव्ही नोंदणी १५ ऑगस्टपासून

रिलायन्स जिओने ५ जुलै रोजी त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात (Annual General Meeting ) मध्ये  जिओ  गिगाफायबर त्याचबरोबर जिओ गिगा टीव्ही आणि जिओ स्मार्ट होम उपकरणे सादर केली होती. जिओच्या ऑप्टिकल फायबर आधारित फिक्स्ड कनेक्शन (ब्रॉडबँड) साठी नोंदणी १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. जिओतर्फे घरगुती वापरकर्त्यांसोबतच लहान आणि मोठ्या बिझनेससाठी सुद्धा ही सेवा एकाचवेळी ११०० शहरांमध्ये उपलब्ध होईल.

जिओ गिगाफायबर सेवेमध्ये गिगाबीट पर सेकंड (Gbps) या वेगाने इंटरनेट सुविधा मिळेल. त्यासोबतच मनोरंजन सेवा सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. जिओ गिगा टीव्ही सेट टॉप बॉक्स द्वारे ६००+ अधिक टीव्ही वाहिन्या, लाखो गाणी, हजारो चित्रपट पाहता येईल.

रजिस्ट्रेशन कसे कराल?
जिओ गिगाफायबर साठी रजिस्ट्रेशन १५ ऑगस्ट पासून MyJio अॅप सोबतच jio.com वर करता येईल. जिओ वापरकर्त्यांना वेबसाइट बरोबरच  MyJio अॅपवर नोटिफिकेशन दिले जाईल, यानंतर सोप्या प्रक्रियेद्वारे नोंदणी करता येईल.

लिंक : Jio GigaFiber Registration
Video Tutorial : How to register Jio GigaFiber Video

वेबसाईटवर जा, तुमची माहिती (पत्ता, फोन क्रमांक) द्या, आणि नोंदणी झाल्याचं दिसेल. याचा थेट अर्थ तुमचं ब्रॉडबँड सुरु केलं जाईल असा नाही. त्यासाठी आणखी काही दिवस/महिने जाऊ शकतात.
Preview Offer अंतर्गत तीन महिने 100Mbps वेगाने दरमहा 100GB इंटरनेट डाटा मिळेल! मात्र ग्राहकांना security deposit साठी ४५०० रुपये द्यावे लागतील आणि ही सेवा दिवाळीत सुरु होईल असं सांगण्यात येत आहे.  
 
रिलायन्सने AGM मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या भागातून सर्वात जास्त नोंदणी होतील त्या ठिकाणी जोडणीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. तुमच्या भागात लवकरात लवकर सेवा मिळावी यासाठी मित्रांना आणि शेजाऱ्यांना सुद्धा याबद्दल माहिती द्या असे जिओतर्फे सांगण्यात आले होते.

जिओ फोन २ 
नव्याने सादर करण्यात आलेला  जिओ फोन २ सुद्धा १५ ऑगस्ट पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. यासाठी  MyJio अॅप किंवा Jio.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल त्याठिकाणी नाव वगैरे माहिती भरल्यानंतर पत्ता टाकून पुढे जाता येईल. जिओ फोन २ साठी ₹२,९९९ ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील. यानंतरच बुकिंग कन्फर्म होईल आणि काही दिवसात तुमच्या पत्त्यावर जिओ फोन वितरित केला जाईल.

जिओ फोनचा फ्लॅश सेल १६ ऑगस्टपासून सुरू होत आहे!  लिंक  

जिओ गिगाटीव्ही द्वारे व्हिडिओ कॉल्स सुद्धा करता येणार आहेत! तसेच व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट जोडून आभासी जगाची सफर सुद्धा घेता येईल! याचबरोबर जिओ ब्रॉडबँड द्वारे स्मार्ट होम सोल्यूशन सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये Smart Speaker, Audio Dongle, Video Dongle, WiFi Extender, Smart Plug, TV Camera, Outdoor Camera यांसारख्या उपकरणांचा समावेश असेल.

या फायबर ब्रॉडबँडचे प्लॅन्स मात्र जाहीर करण्यात आले नसून मराठीटेक तर्फे वेळोवेळी याबद्दल माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

search terms reliance jio broadband GigaFiber GigaRouter gigatv jio phone 2 booking maharashtra 
Exit mobile version