भुवन बाम (BB Ki Vines) बनला आहे १ कोटी सबस्क्रायबर्स असलेला पहिला भारतीय यूट्यूबर!

गेल्या काही वर्षात भारतात वाढलेल्या यूट्यूबच्या वापरामुळे अनेक यूट्यूबर्सना सुद्धा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. यूट्यूबर्स म्हणजे यूट्यूब या प्रसिद्ध व्हिडीओ शेअरींग साईटवर अपलोड करणारे लोक. यांचे व्हिडीओज आता लाखो लोक पाहत असतात. यामधीलच एक म्हणजे भुवन बाम जो भारतात सर्वात लोकप्रिय यूट्यूबर आहे. आजच भुवनच्या बीबी की वाईन्स (BB Ki Vines) या चॅनलचे तब्बल 10 Million (१ कोटी) सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत . 

भुवन बामचं बीबी की वाईन्स YouTube Channel : BB Ki Vines on YouTube

गेल्या काही महिन्यात अचानक प्रसिद्ध झालेल्या अमित भडाना आणि भुवन यांच्या चॅनलमध्ये यावेळी १० मिलियनसाठी स्पर्धा दिसून आली आणि अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने BB Ki Vines चे १ कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण झाले!  ह्या क्षणी भुवनच्या चॅनलचे 10,034,501 subscribers आणि 1,270,448,948 views झाले आहेत! त्यानंतर आता अमित भडानाचे सुद्धा १ कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण झाले असून त्यानंतर गौरव चौधरीचं टेक्निकल गुरुजी हे चॅनल येतं. यूट्यूबकडून दहा मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यावर यूट्यूबर्सना डायमंड प्ले बटन देण्यात येतं! 
भुवन बामची आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे भुवन बामला मराठी उत्तम बोलता येतं!
या लिंकवर भुवनची मराठी मुलाखत पाहू शकाल : https://youtu.be/nlj10afUXB4  

भारतातील सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेले यूट्यूब चॅनल्स : 

  1. T Series
  2. SET India
  3. Zee Music Company
  4. ChuChuTV
  5. ZeeTV
  6. Sony Music India 
  7. Wave Music
  8. CVS 3D Rhymes
  9. Speed Records
  10. Shemaroo
  11. Goldmines TeleFilms
  12. Eros Now
  13. YRF
  14. Colors TV
  15. SAB TV 
  16. Shemaroo
  17. T Series Bhakti
  18. Ultra Bollywood
  19. Tips Official
  20. T Series Apna Punjab 
  21. BB Ki Vines
  22. Amit Bhadana
  23. Aaj Tak
  24. Gaane Sune Ansune
  25. Rajshri

search terms most subscribed indian youtube channel bb ki vines crosses 10 million subscribers marathi

Exit mobile version