Honor 7S सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय!

ऑनर(Honor) तर्फे आज Honor 7S हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या बजेट स्मार्टफोनमध्ये आणखी एक पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. या फोन सोबत फिंगर प्रिंट सेंसर, 18:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, LED सेल्फी लाईट, स्मार्ट फेस अनलॉक, Eye Comfort मोड, सुपर रिसिव्हर मोड, रिअल टाइम हेडसेट मॉनिटरिंग यांसारखे फिचर्स आहेत. शिवाय ड्युअल सिम सोबत २५६GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल.

Honor 7S फ्लिपकार्ट exclusive असून 14 September 2018 पासून हा स्मार्टफोन उपलब्ध होईल. तसेच कंपनीच्या hihonor ऑनलाईन स्टोअरवर सुद्धा उपलब्ध असेल. ऑनर कंपनी हुवावे या कंपनीचा भाग असून हुवावेच्या R&D सेंटरमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

Honor 7S Specifications:
डिस्प्ले : 5.45-inch (13.84 cm) (1440х720)HD+ 18:9 Display
प्रोसेसर : Mediatek MT6739 Cortex A53 (1.5 GHz- Quad-core)
रॅम : 2GB
स्टोरेज : 16GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3020mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 8.0 (Based on Android 8.1 Oreo)
कॅमेरा :  13MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
रंग : Black, Blue, Gold
सेन्सर : Accelerometer, Proximity sensor, Ambient light sensor, Fingerprint sensor, Gyroscope, Compass, Hall-sensor
इतर : Dual Sim + microSD Card Slot, USB 2.0, Bluetooth 4.2
किंमत : ₹6,999

लिंक – Honor 7S on Flipkart 

Exit mobile version