इंडिया मोबाइल कॉंग्रेस २०१८ कार्यक्रम : २५ ऑक्टोबरपासून IMC2018

गेल्या वर्षी सुरुवात झालेल्या या तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमाच यंदा दुसरं वर्ष आहे. यामध्ये अनेक नामवंत कंपन्या, उच्चपदस्थ व्यक्ती,  व्यक्ते यांची उपस्थिती असणार असून यावेळी सुद्धा मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं संशोधन यासंदर्भात भारतात सुरु असलेले प्रयत्न यांची ओळख करून देण्यात येईल.   

२०१८ चा हा कार्यक्रम Aerocity, New Delhi, येथे २५ ते २७ ऑक्टोबर २०१८ दरम्यान चालेल
गेल्या वर्षीच्या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसच्या धर्तीवर भारतात हा तंत्रज्ञान विषयक मोठा कार्यक्रम असेल. मोबाइल, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भाग घेऊन विविध प्रॉडक्ट/उत्पादने सादर करतील!

अधिक माहिती : www.indiamobilecongress.com नोंदणी सुद्धा उपलब्ध  

सहभागी सदस्य

यावेळी मनोज सिन्हा(मंत्री), अरुणा सुंदरराजन, पियुष गोयल(मंत्री), रवी शंकर प्रसाद(मंत्री), धर्मेंद्र प्रधान(मंत्री),  Andrus Ansip (European Commission), सुनील मित्तल(Airtel), मुकेश अंबानी(Reliance), टीके अनुराधा(ISRO), अनुपम श्रीवास्तव(BSNL), आर एस शर्मा(UIDAI), राजन आनंदन(Google), अलेक्स रॉजर्स(Qualcomm), सीपी गुरनानी(Tech Mahindra), बिन्नी बन्सल(Flipkart), गोपाल विट्टल (Airtel), सुनील सुद (Vodafone), टीआर रामचंद्रन (VISA), मनीष शर्मा (Panasonic), अनुपम पाहुजा (PayPal), संजय मलिक (Nokia) यांच्यासह एकूण १९० वक्ते!

search terns : India Mobile Congress #IMC2018 #Marathi #Technology #MWC

Exit mobile version