नोकिया ५.१ प्लस भारतात उपलब्ध! : नोकीयाचा नवा उत्तम पर्याय!

मागील महिन्यात नोकियातर्फे नोकिया ६.१ प्लस आणि नोकिया ५.१ प्लस असे दोन स्मार्टफोन सादर  करण्यात आले होते. नोकिया ६.१ ऑगस्ट पासूनच उपलब्ध झाला होता तर त्यातील नोकिया ५.१ प्लसची किंमत व उपलब्धतेबद्दल आज नोकियाने घोषणा केली आहे. नोकिया ५.१ प्लस १०९९९ रुपयांत फ्लिपकार्ट तसेच nokia.com वर १ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल.

नोकिया ५.१ प्लसमध्ये 19:9 डिस्प्ले, Artificial Intelligence (AI) एन्हान्समेंट, ड्युअल कॅमेरा, HDR फोटोग्राफी, बोके इफेक्ट, बोथी मोड, स्टॉक अँड्रॉइड, फिंगर प्रिंट सेंसर, यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. उत्तम बिल्ड क्वालिटी, स्टॉक अँड्रॉइड बरोबरच वेळोवेळी Security आणि OS अपडेट साठी नोकिया स्मार्टफोन प्रसिद्ध आहेत. नोकियाचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड वन अंतर्गत येतात त्यामुळे गूगल कडून देण्यात येणारा पूर्ण अँड्रॉइड अनुभव तसेच लवकर अँड्रॉइड अपडेट मिळतात.

Nokia 5.1 Plus Specifications
डिस्प्ले : 5.8 inch (1600х900) HD+ 19:9 Display with Notch
प्रोसेसर : MediaTek Helio P60 (4 x A73 1.8GHz + 4 x A53 1.8GHz)
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB(Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3060 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 13MP + 5MP
फ्रंट कॅमेरा : 8 MP
रंग : Blue,  Black, White
सेन्सर : Fingerprint Reader, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Gyroscope
इतर : USB Type-C, Dual Sim Slot (Hybrid ), GPS/AGPS/GLONASS/BDS/Galileo, 3.5mm Audio Jack, Material 2.5D Glass, Bluetooth 4.2
किंमत – ₹१०,९९९

Nokia 5.1 Plus on – Flipkart / Nokia.com

 नोकिया ५.१ प्लस १ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल. तर प्री ऑर्डर नोकिया.कॉम वर आजपासूनच सुरु होतील.

नोकिया ६.१ प्लसला ग्राहकांतर्फे उत्तम प्रतिसाद लाभला असून सुरवातीस अवघ्या ३ मिनिटांत हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. फक्त स्पेसिफिकेशन्स पाहण्याऐवजी ब्रँड व गुणवत्तेकडे अनेक ग्राहकांचा कल वाढत असून नोकियाच्या रुपात ग्राहकांना चांगले पर्याय उपलब्ध होत आहेत.

search terms nokia 5.1 plus india sale price launch 

Exit mobile version