व्हॉट्सअॅप आता जिओफोनवर उपलब्ध !

प्रथमच जिओफोनमधून सुद्धा आता व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. रिलायन्सने जुलै मधील वार्षिक कार्यक्रमात (Annual General Meeting ) दरम्यान जिओ फोन २ सादर करतानाच घोषणा केली होती की जिओ फोनवर व्हॉट्सअॅप लवकरच उपलब्ध होईल.यानंतर आज व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले असून जिओ फोन अॅपस्टोअरवरून आपण डाउनलोड करू शकता.

जिओ फोन हा KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असून व्हॉट्सअॅपकडून यासाठी नवीन व्हर्जन तयार करण्यात आले आहे. यामुळे आता सहज, सोप्या पद्धतीने व सुरक्षितपणे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जिओ फोनवरून मित्र आणि नातेवाईकांसोबत याद्वारे संवाद साधता येणार आहे.

जिओ फोनवरून फोटो, व्हिडिओ शेअर करता येणार आहेत. तसेच व्हॉइस मेसेजसुद्धा पाठवता येतील. सोबतच अँड्रॉइड आणि IOS प्रमाणे जिओ फोनवरील अॅपसुद्धा end-to-end एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केलेले असतील.

प्रथम आपणास जिओ स्टोअर मध्ये जाऊन व्हॉटसअॅप डाउनलोड करावे लागेल यानंतर जिओ फोनवरून व्हॉटसअॅप आयकॉनवर क्लिक करून ओपन करा. त्यानंतर आपला फोन नंबर विचारला जाईल, नंबर सबमिट केल्यानंतर व्हेरिफाय करण्यासाठी आपणास मेसेज व्हेरीफिकेशन कोड येईल. तो सबमिट केला की आपणास जिओ फोनवर व्हॉटसअॅप वापरता येईल. अधिक माहितीसाठी व्हीडिओ सुद्धा पाहू शकता.

search terms : jiophone whatsapp how to use whatsapp in jiophone 

Exit mobile version