एसुस झेनफोन बजेट स्मार्टफोन्स सादर : Zenfone Max M1 व Lite L1

एसुसने आज झेनफोन लाइट आणि झेनफोन मॅक्स असे दोन बजेट स्मार्टफोन्स सादर केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये Snapdragon 430 प्रोसेसर देण्यात आला असून एसुसकडून दोन्ही फोन सोबत 100GB गूगल ड्राईव्ह स्टोरेज मोफत मिळणार आहे.

झेनफोन लाइट आणि झेनफोन मॅक्समध्ये ८२% स्क्रीन टू बॉडी रेशो असून मेटॅलिक फिनिष देण्यात आली आहे. त्याबरोबरच HD+ डिस्प्ले सोबतच पोर्ट्रेट मोड, लाईव्ह फिल्टर, बोके इफेक्ट, HDR,Timelapse, दोन्ही बाजूस LED फ्लॅश अशा सुविधा मिळणार आहेत. त्याचबरोबर एसुसतर्फे मोबाईल मॅनेजर म्हणून अॅप देण्यात येणार असून त्याद्वारे परफॉर्मन्स सुधारणा होण्यास मदत होईल.

झेनफोन लाइट मध्ये फेस अनलॉक तर मॅक्स मध्ये फेस अनलॉक आणि फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. झेनफोन मॅक्स मध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली असून रिव्हर्स चार्जिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे ज्याद्वारे इतर फोन्सचे सुद्धा चार्जिंग झेनफोन मॅक्सने करता येईल.

ब्लॅक आणि गोल्ड अशा दोन रंगांमध्ये हे फोन्स उपलब्ध होणार असून कंप्लीट मोबाईल प्रोटेक्शन सुद्धा या फोन्सवर सुरवातीस ₹९९ मध्ये तर त्यानंतर ₹३९९ मध्ये मिळणार आहे.

Asus ZenFone Max M1 Specifications:
डिस्प्ले : 5.45inch (13.84cm) (1440х720) HD+ 18:9 Display
प्रोसेसर : Snapdragon 430
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Zen UI 5.0 (Based on Android 8.0 Oreo)
कॅमेरा : 13MP
फ्रंट कॅमेरा : 8MP
रंग : Black, Gold
सेन्सर : Fingerprint Sensor, Accelerometer, E-compass, Proximity Sensor, Ambient Light Sensor
इतर : 2.5D Glass, Dual Sim + micro SD Card Slot, Bluetooth 4.0, 3.5mm Audio Jack, Face Unlock, Metallic Finish, Front and Rear LED Flash, 360Degree Recognition, 10W Adapter
किंमत : ₹७४९९ (Offer Price)
लिंक – Asus ZenFone Max M1

Asus ZenFone Lite L1 Specifications :
डिस्प्ले : 5.45inch (13.84cm) (1440х720) HD+ 18:9 Display
प्रोसेसर : Snapdragon 430
रॅम : 2GB
स्टोरेज : 16GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Zen UI 5.0 (Based on Android 8.0 Oreo)
कॅमेरा : 13MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
रंग : Black, Gold
सेन्सर : Accelerometer, E-compass, Proximity Sensor, Ambient Light Sensor
इतर :  Dual Sim + micro SD Card Slot, Bluetooth 4.0, 3.5mm Audio Jack, Face Unlock, Metallic Finish, Front and Rear LED Flash
किंमत : ₹५९९९ (Offer Price)
लिंक – Asus ZenFone Lite L1

हे दोन्ही फोन्स फ्लिपकार्टच्या लवकरच येणाऱ्या स्पेशल धमाका डेजमध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच वरील किंमत ही सुरवातीस सेल साठी असून त्यानंतर लाइट आणि मॅक्स अनुक्रमे ₹६९९९ व ₹८९९९ मध्ये मिळतील.

झेनफोन मॅक्स प्रो या त्यांच्या प्रसिद्ध स्मार्टफोनचे १० लाखाहून अधिक युनिट विक्री केल्याचे एसुसने सांगितले आहे. त्याचबरोबर झेनफोन मॅक्स प्रो फोन साठी लवकरच सॉफ्टवेअर अपडेट द्वारे EIS फॉर व्हिडिओ सपोर्ट, सोबतच बायोमेट्रिक आणि कॅमेरा सॉफ्टवेअर मध्ये सुधारणा मिळणार आहेत. तर झेनफोन 5Z साठी कॅमेरा सॉफ्टवेअर सुधारणांसोबतच १५ नवीन फीचर्स अपडेट द्वारे दिले जातील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version