मधुराज रेसेपी ठरलं दहा लाख सबस्क्रायबर्स असलेलं पहिलं मराठी यूट्यूब चॅनल!

मधुराज रेसेपी मराठी या विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपींबद्दल असलेल्या मधुरा बाचल यांच्या मराठी चॅनलचे यूट्यूबवर नुकतेच जुलै ऑगस्ट दरम्यान दहा लाख (1 Million) सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. दहा लाख सबस्क्रायबर्सवर पोहोचणारं हे पहिलंच मराठी यूट्यूब चॅनल असून याबद्दल त्यांना यूट्यूबकडून गोल्ड प्ले बटनसुद्धा देण्यात आलं आहे.

अवघ्या दोन वर्षातच हा टप्पा यांनी ओलांडला असून २५ ऑगस्ट २०१६ ला सुरु झालेलं हे चॅनल मराठी खवय्यामध्ये लोकप्रिय आहे. हल्ली जवळपास प्रत्येक वेळी एखाद्या पदार्थाची पाककृती यूट्यूब सर्च केली की त्यामध्ये यांचा व्हिडीओ असतोच. हा लेख लिहत असताना सध्या त्यांच्या चॅनलला 12,85,279 सबस्क्रायबर्स असून त्यांचे व्हिडीओ तब्बल 19,08,00,905 वेळा पाहिले गेले आहेत! दररोज जवळपास ४ ते ५ लाख Views मिळत आहेत! यांचं दुसऱ्या भाषांमध्येसुद्धा चॅनल असून त्यांनासुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो. नुकतंच त्यांनी स्वतःच पाककृतीसंबंधित पुस्तकही प्रकाशित केलं असून अॅमेझॉन, बुकगंगावर उपलब्ध आहे.   

मधुराज रेसेपी यूट्यूब चॅनल लिंक : MadhurasRecipe Marathi on YouTube 

यूट्यूबकडून देण्यात येणारं प्ले बटन सबस्क्रायबर्सचा (ज्यांनी त्या चॅनलचे व्हिडीओच सभासदत्व स्वीकारलं आहे असे लोक) ठराविक टप्पा पार पडल्यावर देण्यात येतं. सिल्व्हर, गोल्ड आणि डायमंड असं तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर हे बटन पाठवलं जातं. हे बटन केवळ व्हायरल किंवा टॉप १० सारखे व्हिडीओ टाकणाऱ्या चॅनल्सना दिलं जात नाही. यूट्यूब हे अवॉर्ड्स पाठवण्यापूर्वी स्वतः चॅनल्स तपासून नियम पाळले असल्याची खात्री करतं. 

प्ले बटन यूट्यूबर्सना दिलं जातं. यूट्यूबर्स म्हणजे असे लोक जे यूट्यूब या प्रसिद्ध व्हिडीओ शेरिंग साईटवर व्हिडीओ शेअर करतात आणि ज्यांनी कुठल्याही कंपनी/ब्रँडचे प्रतिनिधी म्हणून व्हिडीओ न टाकता स्वतःच्या किंवा एका ग्रुपच्या नावावर अपलोड केलेले असतात.

  1. 1,00,000 : Silver Play Button : १ लाखाचा टप्पा पार करणाऱ्यांना  
  2. 10,00,000 : Gold Play Button : दहा लाखांचा टप्पा पार करणाऱ्यांना 
  3. 10,00,00,000 : Diamond Play Button : १ कोटीचा टप्पा पार करणाऱ्यांना  

मराठी यूट्यूब विश्वाबद्दल थोडीशी ओळख :  

मराठीत अलीकडे व्हिडीओ तयार करून यूट्यूबवर टाकण्याचं प्रमाण वाढीस लागलेलं दिसतंय. आता इंटरनेटचे दरसुद्धा कमी झाल्यामुळे बरेच जण स्मार्टफोन्सवर व्हिडीओ पाहण्यास पसंती देतात. काही अडचण आली की लगेच सर्च करून व्हिडीओ पाहून ती दूर करता येते. मनोरंजन, तंत्रज्ञान, पाककृती, गाणी, घरगुती गोष्टीची दुरुस्ती/निर्मिती, गेमिंग, प्रवास अशा चॅनल्सना खास प्रतिसाद दिसून येतो. तरीही मराठी लोकांचं मराठी व्हिडीओ पाहण्याचं प्रमाण आणखी वाढायला हवं आहे, इंग्लिश/हिंदी चॅनल्स ऐवजी मराठी चॅनल्सना प्राधान्याने पाहायला हवं आणि यासाठी आपण सर्वानी मराठीत व्हिडीओ टाकणाऱ्या सर्व यूट्यूबर्सना सहकार्य करून प्रतिसाद द्यायला हवा…
   
मराठीत सिल्व्हर प्ले बटन मिळालं आहे असे आमच्या माहितीतील  काही चॅनल्स :

 (यादी अपूर्ण असू शकते, ज्यांनी प्ले बटन असा उल्लेख केलेल्या पोस्ट केल्या आहेत त्यांच्याबद्दलच सर्चद्वारे माहिती काढता आली आहे)
आणखी काही प्रसिद्ध यूट्यूब चॅनल्स  :  
  • कोरी पाटी प्रॉडक्शन्स : Kori Pati Productions : 426,015 subscribers
  • रुचकर मेजवानी : Ruchkar Mejwani : 441,118 subscribers
  • स्नेहलनीती : SnehalNiti : 3,45,527 subscribers
  • कॅफे मराठी : CafeMarathi : 318,254 subscribers
  • चावट : Chavat : 228,733 subscribers
  • खासरे टीव्ही : Khaas Re TV : 97,382 subscribers
  • ShotPutFilms : ShotPutFilms : 94,497 subscriber
  • जीवन कदम  व्हिलॉग (Vlogs) : JeevanKadamVlogs : 90,037 subscribers
  • सफर मराठी : Safar Marathi : 37,553 subscribers
  • ADbhoot : ADbhoot : 29,180 subscribers
  • रानवाटा : Raanvata : 13,808 subscribers
  • Bharatiya Touring Party : Bha2Pa : 13,280 subscribers

यांच्यासोबत बरीच मराठी मंडळी हिंदी, इंग्लिश चॅनल्समध्ये प्रसिद्ध आहेत.

आणखी कोणती नावे सुचवायची असल्यास कमेंटद्वारे, फेसबुक/ट्विटरवर सुचवू शकता आम्ही या यादीमध्ये कंपनी/ब्रॅंडसंबंधित
चॅनल्सचा समावेश केलेला नाही याची नोंद घ्यावी . 
search terms top youtube channels in marathi best marathi youtubers 
Exit mobile version