यूट्यूबच्या सारख्या दिसणाऱ्या जाहिरातींना वैतागून जगभरात यूट्यूबच्या वेबसाइटवर अनेक जण ॲडब्लॉकर एक्सटेन्शन वापरतात. ज्यामुळे यूट्यूबवर जाहिराती दिसणं बंद होतं. मात्र यामुळे यूट्यूबला त्या व्हिडिओ मार्फत मिळणारं उत्पन्न मिळत नाही आणि यामुळेच त्यांनी आता मोठ्या प्रमाणात ॲडब्लॉकर्स वापरणाऱ्या युजर्सना व्हिडिओ पाहता येणार नाहीत अशी वॉर्निंग दाखवायला सुरूवात केली आहे.
ॲडब्लॉकर्समध्ये Ublock Origin, Adblock Plus, AdGuard असे अनेक क्रोम एक्सटेन्शन्स लोकप्रिय झाले आहेत. शिवाय मायक्रोसॉफ्ट एज, ब्रेव्ह, ओपेरा सारखे ब्राऊजरतर स्वतःच ॲड ब्लॉक करण्याची सोय देतात. यामुळे आपण ब्राऊजरमध्ये कोणत्याही वेबसाइटवर गेलो तरी जाहिराती दिसत नाहीत. मात्र यूट्यूबने आता एक्सटेन्शन्स सोबत या ब्राऊजर वापरणाऱ्यांनासुद्धा वॉर्निंग दाखवायला सुरुवात केली आहे.
सध्या यापैकी काही एक्सटेन्शन्स आणि ब्राऊजरमध्ये काही सेटिंग्स बदलून अजूनही पळवाट काढता येते असंही बरेच जण शेयर करत आहेत. मात्र यूट्यूबने यावर आणखी कडक पावले उचलली तर कदाचित येणाऱ्या काळात ते सुद्धा शक्य होणार नाही.
तर यावर उपाय काय ? पहिला पर्याय म्हणजे हे एक्सटेन्शन्सचा वापर सुरू ठेवणार असाल तर यूट्यूबला whitelist म्हणजेच त्या एक्सटेन्शनमध्ये या साईटवरील जाहिराती ब्लॉक करू नको असे सांगणाऱ्या यादीत जोडावं लागेल जेणेकरून फक्त यूट्यूबवर जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल.
आणि दुसरा पर्याय म्हणजे यूट्यूब प्रीमियमचं Subscription विकत विकत घेणे. याद्वारे तुम्हाला कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत, ऑफलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करता येतील आणि बॅकग्राऊंड प्ले म्हणजेच यूट्यूब सुरू ठेऊन दुसऱ्या App मध्ये जाण्याची सोय मिळते. शिवाय यासोबतच यूट्यूब म्युझिकसुद्धा सभासदत्व मिळेल.
YouTube Premium साठी दरमहा १२९ रु मोजावे लागतात. पण जर तुम्ही ६ जणांमध्ये मिळून यूट्यूब प्रीमियमचा फॅमिली प्लॅन घेतला तर महिन्याला फक्त ३२ रुपयात ही सेवा तुम्हाला वापरता येईल. याबद्दल माहितीसाठी तुम्ही आमचा व्हिडिओ पाहू शकता.