गूगल मॅपवर आता रिक्षा मोड : ऑटोरिक्षाचे मार्ग व भाडं दर्शवेल!

गूगल मॅप्सवर आता ऑटो रिक्षासाठीसुद्धा पर्याय जोडण्यात आला असून यामुळे आपण शोधत असलेल्या मार्गावर कॅब्स सोबत रिक्षाचाही पर्याय दिसेल! यामध्ये रिक्षाप्रवासाचं भाडं, अंतर दाखवलं जाईल जेणेकरून नियोजन करणं सोपं होईल!
 

ही सोय गूगल मॅप्समध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट व कॅबच्या आयकॉनवर टॅप केल्यावर दिसेल. सध्या ही सेवा फक्त दिल्ली शहरात उपलब्ध असून लवकरच इतर शहरात उपलब्ध करून देण्याचा गूगलचा मानस आहे. सेवा दिल्लीतच उपलब्ध असल्यामुळे दिल्ली वाहतूक पोलिसांची मदत घेऊन अपेक्षित मार्ग आणि नियमानुसार अधिकृत भाडं दाखवलं जाईल. यामुळे खरेतर नव्या ठिकाणी गेल्यावर होणारी फसवणूकही टाळता येऊ शकते!      

ही सुविधा अँड्रॉइड यूजर्ससाठीच असून येत्या काळात आणखी सहारे जोडून याची उपयुक्तता वाढवणार असल्याचं गूगल मॅप्सचे प्रमुख विकास गुप्ता यांनी सांगितलं!

Exit mobile version