गेम अवॉर्ड्स २०१८ : गॉड ऑफ वॉर सर्वोत्तम : अनेक गेम्सचे प्रिव्ह्यू सादर!

द गेम अवॉर्ड्स हा कार्यक्रम जेफ किली यांच्याकडून आयोजित केला जातो. यंदा या कार्यक्रमाचं पाचवं वर्ष होतं. आता गेमिंग क्षेत्रात हा कार्यक्रम महत्वाचा ठरत असून या कार्यक्रमादरम्यान बरेच गेम डेव्हलपर्स त्यांच्या येणाऱ्या गेम्सबद्दल माहिती इथे जाहीर करू लागले आहेत. या वर्षीच्या सर्वोत्तम गेमचा बहुमान गॉड ऑफ वॉर या प्लेस्टेशन एक्सक्लुसिव्ह गेमला मिळाला असून रॉकस्टार गेम्सच्या रेड डेड रिडम्प्शनला सर्वाधिक चार बक्षिसे मिळाली आहेत! यावर्षीचा कंटेंट क्रिएटर ऑफ द इयर पुरस्कार निंजा (टायलर ब्लेव्हिन्स) याला मिळाला आहे!      
नव्याने येणाऱ्या गेम्समध्ये प्रामुख्याने फार क्राय न्यू डॉन, डेव्हील मी क्राय, मोर्टल कॉम्बॅट यांची चर्चा असेल. फोर्टनाईटमध्येही बऱ्याच नव्या गोष्टी उपलब्ध होत असून आता विमानेसुद्धा उडवता येतील!
कालच काउंटर स्ट्राईक ग्लोबल ऑफेन्सिव्हमध्येही पब्जी/फोर्टनाईट सारखा बॅटल रोयाल मोड जोडण्यात आला असून याला डेंजर झोन असं नाव देण्यात आलं आहे आणि हे गेम आता मोफत उपलब्ध असणार आहे!

संपूर्ण यादी अधिकृत लिंक : The Game Awards 2018 Winners

गेम अवॉर्ड्स २०१८ खालील प्रमाणे

गेम ऑफ द इयर : गॉड ऑफ वॉर (प्लेस्टेशन)Best Game Direction : God of War
Best Narrative Red Dead Redemption 2
Best Art Direction : Return of the Obra Dinn
Best Score / Music : Red Dead Redemption 2
Best Audio Design : Red Dead Redemption 2

Games for Impact : Celeste
Best Ongoing Game : Fortnite
Best Performance Roger Clark as Arthur Morgan, Red Dead Redemption II
Best Independent Game : Celeste
Best Mobile Game : Florence 

Best VR/AR Game : Astro Bot Rescue Mission
Best Action Game : Dead Cells
Best Action/Adventure Game : God of War
Best Role-Playing Game Monster Hunter: World
Best Fighting Game : Dragon Ball FighterZ
Best Family Game : Overcooked 2

Best Strategy Game : Into the Breach
Student Game Award : Combat 2018
Best Sports/Racing Game : Forza Horizon 4
Best Debut Indie Game : The Messenger
Best Multiplayer Game : Fortnite
Best Esports Game : Overwatch
Best Esports Team : Cloud9, LoL
Best Esports Event : League of Legends World Championship

Content Creator Of The Year : Ninja

आता पाहूया लवकरच सादर होणाऱ्या किंवा नव्याने जाहीर झालेल्या गेम्सचे प्रिव्ह्यू व्हिडीओज

Exit mobile version