ROG Mothership सादर! : एसुसचा भन्नाट लॅपटॉप

गेमिंग लॅपटॉप्सची वाढती मागणी लक्षात घेऊन पीसी कंपन्या नेहमी नवनवीन डिझाईन घेऊन गेमिंग लॅपटॉप सादर करतात. आता अलीकडच्या काळातील सर्वात भन्नाट म्हणता येईल अशा रूपात एसुसने नवा ROG Mothership लॅपटॉप सादर केला आहे! हा लॅपटॉप खर्‍या अर्थाने डेस्कटॉप गेमिंगसाठी पोर्टेबल पर्याय म्हणता येईल. अनेक जण याच्या डिझाईनमुळे याला गेमिंग लॅपटॉप्समधील सर्फेस प्रो देखील म्हणत आहेत! हा आज CES 2019 च्या मंचावर सादर करण्यात आला आहे. सीईएस २०१९ (कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ८ जानेवारीपासून सुरू होत आहे !

सर्फेस प्रो प्रमाणे मागे काढता येत असलेल किकस्टँड, वेगळा करून घडी घालता येणारा किबोर्ड व उत्कृष्ट गेमिंग क्षमतेसोबत हा लॅपटॉप सादर झाला आहे! याचा किकस्टँड लॅपटॉप पृष्ठभागावर ठेवला की आपोआप बाहेर येतो! यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी दिलेले vents (कुलिंग सिस्टिम) सुद्धा नव्याने डिझाईन करण्यात आले असून गेमिंग वेळी तापमान कमी ठेवण्यास मदत करतील…याच्या डिस्प्लेचा 144Hz रिफ्रेश रेट आणि सोबत GSync सपोर्ट यामुळे गेमिंगमध्ये चांगला अनुभव येईल.

ROG Mothership GZ700
प्रोसेसर : Intel® Core™ i9-8950HK
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Home / Pro
डिस्प्ले : 17.3” FHD (1920×1080) IPS-level panel, 144Hz, 3ms, 100% sRGB, Optimus, G-SYNC
GPU : NVIDIA® GeForce RTX™ 2080 8GB GDDR6 VRAM
रॅम : DDR4 2666MHz SDRAM up to 64GB
स्टोरेज : 3 x M.2 NVMe PCIe 3.0 x4 512GB SSD
पोर्ट्स : 1 x USB3.1 Gen2 (Type-C) / Thunderbolt 3, 1 x USB3.1 Gen2 (TypeC) / VirtualLink, 3 x USB3.1 Gen2 (Type-A), 1 x USB3.1 Gen1 (Type A) / USB charger +, 1 x HDMI 2.0, 1 x 3.5mm headphone and microphone combo jack
1 x 3.5mm microphone jack, 1 x RJ-45 jack, 1 x SD card reader, 1 x Kensington lock
किबोर्ड : Detachable with wired or wireless modes, Per-key Aura Sync RGB backlighting
ऑडिओ : 4 x 4W speakers with Smart Amp technology, Array microphone
वजन : 4.7kg
किंमत :

Exit mobile version