Nvidia GeForce RTX 2060 ग्राफिक्स कार्ड सादर!

GTX 1060 पेक्षा ६०% अधिक वेगवान व 1070 Ti पेक्षा अधिक चांगलं गेमिंग!

काही महिन्यांपूर्वी RTX 2080 Ti, 2080, 2070 सादर केल्यानंतर आता एनव्हीडियाने त्यांच्या मध्यम किंमतीच्या ग्राफिक्स कार्ड्समध्ये नवीन RTX 2060 सादर केलं आहे! CES 2019 च्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात याबाबत घोषणा करण्यात आली.

RTX 2060 मध्ये 240 tensor cores चा समावेश असून 52 teraflops पर्यंत डीप लर्निंगसाठी वापर करण्याची क्षमता आहे! हे कार्ड 6GB of GDDR6 असेल आणि 5 giga-rays of real-time ray tracing उपलब्ध असेल. ज्यामुळे बॅटलफील्ड ५ सारख्या गेम्समधील सपोर्ट असलेल्या रे ट्रेसिंगचा वापर करून गेम्स खेळता येतील.

RTX 2060 हे नवं GPU कार्ड आधीच्या 1070 Ti पेक्षा अधिक वेगाने कामगिरी करेल असा दावा एनव्हीडियाने केला आहे! त्याआधीच्या सर्वात यशस्वी ठरलेल्या GTX 1060 पेक्षा ६०% अधिक वेगवान असल्याचंसुद्धा सांगण्यात आलं आहे! या नव्या कार्डची किंमत $349 (₹२४५००) असल्याच जाहीर करण्यात आलं असून भारतामध्ये ही किंमत वरखाली होऊ शकते! हे कार्ड १५ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे. डेल, एसर, एचपी, इत्यादींच्या कम्प्युटर्समध्ये या कार्डचा समावेश केलेला पाहायला मिळेल. भेट म्हणून Nvidia ने RTX 2060 व 2070 सोबत Anthem किंवा Battlefield V गेम मोफत देण्याचं ठरवलं आहे जर तुम्ही 2080 Ti घेणार असाल तर वरील दोन्ही गेम मोफत मिळतील!

Exit mobile version