ट्विटरची वेबसाइट लवकरच नव्या रूपात!

ट्विट्स वाचण्याचा नवा अनुभव !

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर लवकरच त्यांच्या डेस्कटॉप वेबसाइटसाठी नवं डिझाईन उपलब्ध करून देत आहे. यामध्ये नवे शॉर्टकट, नवा ट्रेंडिंग विभाग, नवं इमोजी बटन पहायला मिळेल!
याबाबत त्यांनी ट्विटरवरच माहिती दिली असून खालील ट्विटमध्ये व्हिडीओसुद्धा पाहू शकाल.

https://twitter.com/Twitter/status/1087791357756956680

नव्या डिझाईनमध्ये ट्विटर तीन ऐवजी दोनच कॉलममध्ये उपलब्ध असेल यामुळे ट्विट्स वाचणं सोपं होईल असं ट्विटरला वाटतं! नवीन ट्विटसाठी स्वतंत्र मोठं बटन देण्यात आलं आहे. नाईट मोड व डाटा सेव्हर हे पर्याय सुद्धा सहज वापरता येतील असे देण्यात आले आहेत. नव्या डिझाईनवर नाईट मोडमध्येच अधिक चांगला अनुभव येतोय असं आमचं प्राथमिक निरीक्षण आहे. नॉर्मल मोडमध्ये जास्तच पांढरा रंग दिसत असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे!

हे नवं डिझाईन सर्वांसाठी नेमकं कधी उपलब्ध होईल हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

Search Terms : Twitter’s new desktop interface going live for some users

Exit mobile version