शायोमीच्या घडी घालता येणार्‍या फोनची चर्चा!

शायोमी (Xiaomi) या चीनी कंपनीने चीनच्या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट Weibo वर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये कंपनीचे प्रमुख लिन बिन हे घडी घालता येणारा फोन वापरत असल्याच दिसत आहे! आणि आजवर आलेल्या घडी घालता येणार्‍या फोनपेक्षा वेगळा असण्याच कारण याच्या दोन बाजूंनी घड्या घालता येतात! टॅब्लेट सारखा दिसणारा हा फोन घडी घालून नेहमीच्या फोनसारखा बनवता येतो!

https://youtu.be/w3-aDOMI6Mk
शायोमीचे सहसंस्थापक लिन बिन घडी घालता येणार्‍या फोनसोबत

शायोमीने याविषयी तांत्रिक माहिती दिलेली नसली तरी हे प्रत्यक्षात उपलब्ध होणारं मॉडेल नसेल कारण याच्या चाचण्या अद्याप सुरू आहेत. फ्लेक्सिबल फोनची निर्मिती करताना बर्‍याच अडचणी आल्याच लिन बिन यांनी सांगितलं. या फोनसाठी MIUI मध्ये बदल करून घडी घातल्यावर होणारे बदल अॅडजस्ट करून घेतील असं पाहायला मिळत आहे.

सध्या सॅमसंग, हुवावे, लेनेवो अशा कंपन्यासुद्धा घडी घालता येणार्‍या फोन्सच्या शर्यतीत आहेत. सॅमसंगनेही त्यांचा डेमो काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. नॉच नंतर आता अधिक मोठा डिस्प्ले देण्यासाठी हे नवं रूप देण्याच्या प्रयत्नात कंपन्या दिसत आहेत. मात्र खरच अशा फोन्स गरज आहे का हा प्रश्न पडतोच … लवकरच मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस (MWC) सुरू होईल तेथेही असे काही प्रयत्न पहायला मिळू शकतील…

search terms : xiaomi foldable phone demo on Weibo by Lin Bin

Exit mobile version