कॅनन EOS RP सादर : नवा फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा!

गेले काही दिवस चर्चा सुरू असलेला कॅननचा नवा फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा EOS RP आज सादर झाला आहे. यामध्ये 26.2-megapixel full-frame CMOS सेन्सर असून Digic 8 इमेज प्रोसेसर आहे. Dual Pixel autofocus व ३ इंची पूर्णपणे फिरणारी स्क्रीनसुद्धा देण्यात आली आहे.
सोनीने मिररलेस कॅमेरा बाजारात मिळवलेलं वर्चस्व पाहता आता इतर कंपन्यांनीही मिररलेस तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बाजारात आणण्यास सुरुवात केलेली दिसते. कॅननच्या EOS R
नंतर आता नव्या EOS RP, निकॉनच्या Z6 व Z7 ने उशिरा का होईना सोनीसमोर आवाहन निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

EOS RP मध्ये 2.36-million-dot electronic viewfinder दिलेला असून ISO रेंज 100- 40,000 (expandable to 50-102,000) अशी मिळेल. हा कॅमेरा 4K video 24fps ने शूट करू शकेल. मात्र हा व्हिडिओ अजूनही क्रॉप प्रकरचाच असेल. कॅननने 4K मध्ये व्हिडिओ क्रॉप करण्यामागे कॅमेरा बॉडी गरम न होऊ देण्यासाठी असं केल्याच कारण दिलं आहे. कॅननच्या सध्याच्या लेन्सना सपोर्ट देण्यासाठी कॅननने अॅडॅप्टरसुद्धा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Canon EOS RP Specs
LENS COMPATIBILITY RF Mount lenses
SENSOR TYPE : Full-Frame CMOS sensor
NUMBER OF PIXELS (EFFECTIVE) : Approx. 26.2-megapixel
ISO SENSITIVITY ISO range of 100-40000 (expandable to 50-102400)
BATTERY LIFE (STILL IMAGES) : Approx. 250 shots
AutoFocus : Dual Pixel CMOS AF system
Continuous Shooting Speed : 5fps
VIEWFINDER TYPE : 0.39-inch, 2.36-million-dot OLED electronic viewfinder
MONITOR TYPE : 3-inch, 1.04-million-dot Vari-angle touchscreen LCD
इतर : focus peaking, 8.3-megapixel still photo frame grabs from 4K video, Wi-Fi/Bluetooth connectivity, built-in stereo microphones, 23 custom functions, water/dust resistance, USB charging.
किंमत : EOS RP Body
Body (extension grip + mount adapter): $1,299
Body (extension grip + mount adapter) + RF 24-105mm f/4 lens: $2,199
Body (extension grip + mount adapter) + 24-105mm f/3.5 – 5.6 IS EF-mount lens: $1,699

https://youtu.be/8hH1mJlnzZM
Exit mobile version