नोकीयाचा तब्बल ५ कॅमेरे असलेला फोन Nokia 9 PureView सादर!

होय नोकीयाचे फोन्स बनवणाऱ्या HMD Global ने मागे ५ व पुढचा एक असे एकूण ६ कॅमेरे असलेला फोन सादर केला आहे! Nokia 9 PureView हा फोन मागच्या बाजूस आजवर सर्वाधिक कॅमेरे असलेला फोन ठरला आहे! हा फोन MWC (मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१९) मध्ये Nokia 4.2, Nokia 3.2, Nokia 210 व Nokia 1 Plus यांच्यासोबत सादर केला आहे!

या फोनमधील पाच पैकी दोनच कॅमेरे रंगीत (RGB) फोटो काढतात तर बाकीचे तीन मोनोक्रोम प्रकारचे… ते उर्वरित कॅमेरा वेगळ्या exposure ने फोटो काढतील आणि कॅमेराच बटन दाबताच एकावेळी सर्वच कॅमेरे फोटो काढतील आणि नंतर हे सर्व फोटो एकत्रित जोडले जाऊन एक स्वतंत्र सुस्पष्ट फोटो पाहता येईल! या पाच लेन्स प्रकाराला पेंटा लेन्स म्हटलं जाणार आहे. यामध्ये Zeiss ऑप्टिक्सचा वापर केलेला आहे. सर्व पाचही कॅमेरा लेन्स एकाच प्रकारच्या 12MP f/1.8 असून या फोनला 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 845 वापरलेला आहे जो खरेतर तीनच लेन्सना सपोर्ट करतो मात्र नोकियाने Qualcomm सोबत काम करून खास अपवाद बनवला आहे! यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा जोडलेला आहे! याची किंमत $699 जाहीर करण्यात आली आहे भारतीय किंमत नंतर सांगण्यात येईल…

Nokia 9 PureView Specs :
डिस्प्ले : PureDisplay 5.99” QHD+ pOLED 2K HD
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845
रॅम : 6GB LPPDDR4X
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 5 x 12 MP, f/1.82 (2 x RBG, 3 x mono)
फ्रंट कॅमेरा : 20 MP
बॅटरी : 3320mAh with Qi Wireless charging
वजन : 172g
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth® 5.0, GPS/AGPS+GLONASS+BDS, NFC, ANT+, USB Type C 3.1
सेन्सर्स : In-screen fingerprint sensor, ALS/PS, G-sensor, E-compass, Gyro, Hall sensor, Barometer, Haptic vibrator
किंमत : $699 (भारतीय किंमत नंतर सांगण्यात येईल)

Exit mobile version