सॅमसंग गॅलक्सी फोल्ड : घडी घालता येणारा स्मार्टफोन सादर!

काही दिवसांपूर्वी घडी घालता येणारा फोन सादर करण्याची माहिती दिल्यानंतर सॅमसंगने आज त्यांचा नवा गॅलक्सी फोन सादर केला असून या फोनची घडी घालता येते आणि घडी उलगडताच याचा 7.3″ डिस्प्ले असलेला टॅब्लेट बनतो! यामध्ये एकावेळी आपण तीन अॅप्स वापरू शकतो! उदा. यूट्यूब, व्हॉट्सअॅप व ब्राऊजर असे कोणतेही तीन अॅप्स एकाचवेळी! या फोनचं नाव Samsung Galaxy Fold असं असणार आहे! गॅलक्सी अनपॅक्ड २०१९ मध्ये याबाबत घोषणा करण्यात आली!

याचं खास वैशिष्ट्य असलेला डिस्प्ले म्हणजे घडी घालता येणारा किंवा Foldable फोन हा खरोखर मार्केटमध्ये उपलब्ध होणारा पहिलाच फोन ठरणार असून घडी घातलेल्या अवस्थेत असलेल अॅप घडी उघडताच मोठ्या रूपात उपलब्ध होईल. म्हणजे 4.6″ डिस्प्लेवरून थेट 7.3″ इंची डिस्प्लेवर पाहता येईल ते सुद्धा अगदी सहज!

अपडेट (०५/९/२०१९) : गॅलक्सी फोल्डच्या डिस्प्लेमधील हार्डवेअर अडचणींमुळे सॅमसंगने हे उत्पादन पुढं ढकललं होतं. ते आता ६ सप्टेंबरपासून कोरियामध्ये उपलब्ध होत असून यामध्ये आधीच्या अडचणी दूर करून काही डिझाईन बदल करण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Fold Specs :
डिस्प्ले : 7.3” QXGA+ Dynamic AMOLED (4.2:3)
Cover display: 4.6” HD+ Super AMOLED (21:9)
प्रोसेसर : 7nm 64-bit Octa-core processor
रॅम : 12GB RAM(LPDDR4x)
स्टोरेज : 512GB (UFS3.0)
कॅमेरा : 16MP Ultra Wide F2.2 + 12MP Wide-angle Dual Pixel AF, OIS, F1.5/F2.4 + 12MP Telephoto, PDAF, OIS, F2.4, 2X optical zoom (तीन कॅमेरा)
फ्रंट कॅमेरा : 10MP Selfie, F2.2 + 8MP RGB Depth, F1.9 (दोन कॅमेरा)
कव्हर कॅमेरा : 10MP Selfie Camera, F2.2 (Cover camera)
बॅटरी : 4,380mAh (दोन बॅटरींचा समावेश) Fast Charge Support QC2.0
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : Wireless Charging,
सेन्सर्स : Fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
किंमत : $1,980 (~₹ १,४१,०००) (लवकरच भारतीय किंमत सांगण्यात येईल)

https://youtu.be/E9ydQoi2VbA
Exit mobile version