सोनी एक्सपिरीया 1 सादर : पहिला 4K HDR OLED डिस्प्ले फोन!

सोनी कंपनीने मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये Xperia 1, Xperia 10 व Xperia 10 Plus असे तीन स्मार्टफोन्स सादर केले असून यामधील Xperia 1 हा त्यांचा फ्लॅगशिप फोन असेल. या फोन मध्ये बर्‍याच गोष्टी जगत सर्वप्रथम जोडण्यात आलेल्या आहेत. 21:9 CinemaWide 4K HDR OLED, तीन लेन्स असलेला कॅमेरा ज्यामध्ये Eye AutoFocus चा समावेश, CineAlta चे सिनेमा मोड, Dolby Atmos साऊंड,इ सुविधा एक्सपिरीया 1 मध्ये पाहायला मिळतील! 21:9 अस्पेक्ट रेशोमुळे जवळपास सर्वच चित्रपट मूळ स्वरुपात पूर्णस्क्रीनवर सहज पाहता येतील!

गेली काही वर्षं फोन्सच्या मार्केटमधून सोनी मागे पडत चालली आहे. काही ट्रेंड्समध्ये उशिरा सहभागी होणं, ग्राहकांच्या मागणीनुसार सोयी न पुरवणं, अवाजवी किंमत अशा गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतील. Xperia च्या नाव देण्याची पद्धत न समजण्याइतकी विचित्र आहे. आता सुद्धा सध्याच्या फोन्सच्या मानाने फारच कमी बॅटरी असलेला हा फोन एकदम उभ्या डिझाईनमध्ये बनवण्यात आला आहे. याला आता कितपत प्रतिसाद मिळेल तो नंतर कळेलच…

Sony Xperia 10, Xperia 10 Plus व Xperia 1 (अनुक्रमे)

Sony Xperia 1 Specs :
डिस्प्ले : 6.5″ 4K HDR OLED (1644×3840) 21:9 CinemaWide
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
रॅम : 6GB RAM (LPDDR4X)
स्टोरेज : 128GB + MicroSD slot (up to 512GB)
कॅमेरा : Triple Camera 12MP F1.6 + 12MP F2.4+ 12MP F2.4 Super wide-angle, 2x optical zoom
फ्रंट कॅमेरा : 8MP HDR photo SteadyShot
बॅटरी : 3330 mAh USB Power Delivery (USB PD) fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ (2.4/5GHz) Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB Type-C, Water resistant (IP65/68), Corning Gorilla Glass 6, Dolby Atmos Stereo speaker.
सेन्सर्स : Accelerometer, Ambient light sensor, Barometer sensor, eCompassTM, Fingerprint sensor, Game rotation vector, Geomagnetic rotation vector, Gyroscope, Hall sensor, Proximity sensor, RGBC-IR sensor
किंमत : अद्याप जाहीर केलेली नाही

Exit mobile version