फेसबुक, इंस्टाग्राम अनेक तास बंद अवस्थेत! यूजर्स ट्विटरवर होत आहेत व्यक्त!

गेल्या जवळपास दहा तासांपासून जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑक्युलस, इ. फेसबुककडे मालकी असलेल्या सर्वच वेबसाइट/अॅप्सवर आजपर्यंत सर्वाधिक वेळ बंद पडण्याची घटना घडली. भारतात १३ मार्च रात्रीपासून हा प्रकार पाहायला मिळाला. ही पोस्ट लिहीत असतानासुद्धा अनेक ठिकाणी अजूनही अनेक यूजर्सना लॉगिन मध्ये अडचणी येत आहेत!

अर्थात सगळीकडे सर्वच सेवा बंद आहेत असं नाही. भारतात सर्व सेवा पूर्ववत झाल्याचं दिसत आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही पुर्णपणे सुरू झाली नसल्याचं अनेकांनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलं आहे. एरवी फेसबुक, इंस्टाग्रामवर बराच वेळ व्यतीत करणारे अनेक जण आज ट्विटरवर त्यांच्या स्टेट्स, पोस्ट्स टाकताना पाहायला मिळालं. काल रात्रीपासून ट्विटरवर #FacebookDown#InstagramDown ट्रेंड होत आहे.

याबद्दल बोलताना फेसबुकने खालील माहिती दिली असून हा कोणत्याही प्रकारच्या DDoS अटॅक झालेला नसून तांत्रिक गोष्टींमध्ये बिघाड झाल्यामुळे असं झाल्याचं सध्यातरी सांगितलं आहे. दरम्यान अनेकांनी याबद्दल मीम्सच्या रूपात चेष्टा करत ट्विटरवर आनंद घेतला! विशेष म्हणजे वर्ल्ड वाईड वेबने आपला तिसावा वाढदिवस साजरा केल्यावर काही तासातच हा प्रकार घडलाय!

इंस्टाग्रामची सेवा पूर्वरत झाल्याचं सांगताना…

एखादी वेबसाइट डाउन आहे की नाही हे पाहायचं असल्यास https://downdetector.com/ ही एक उत्तम वेबसाइट आहे.

ह्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला हवी ती वेबसाइट/सेवा निवडा. गेल्या काही तासात आणखी किती जणांना व कोणत्या भागात लॉगिन संबंधी अडचणी येत आहेत हे दिसेल
Exit mobile version