गूगलकडे आहे तुमच्या ऑनलाइन शॉपिंगची सर्व माहिती!

गूगल या सर्च इंजिन वेबसाइटने आता जवळपास आपलं सर्व दैनंदिन आयुष्य व्यापून टाकलं आहे. सर्च, वेब ब्राऊजर, ईमेल, ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग, ऑपरेटिंग सिस्टम, इ. सर्व माध्यमातून गूगलकडे आपली माहिती जमा होत असते. मात्र अलीकडे उघड होणार्‍या पर्यायांनुसार मात्र गूगलकडे असणारं माहितीचं प्रमाण नक्कीच काळजी करायला लावणारं आहे. CNBC च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखानुसार गूगलकडे आपण आजवर केलेल्या सर्व ऑनलाइन शॉपिंग सर्व माहिती साठवली जात असल्याच उघड झालं आहे. यासाठी गूगलने दिलेल्या नव्या पर्चेसेस (Purchases) पर्यायाचा वापर होतो.

https://myaccount.google.com/purchases

या लिंकवर जाऊन तुमच्या गूगल अकाऊंटला लॉगिन करा

या पर्चेसेसच्या लिंकवर गेल्यास तुम्ही आजवर करत असलेल्या ऑनलाइन खरेदीची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते आहे. आपल्याला त्या त्या वेबसाइटकडून आलेल्या ईमेलमधून गूगल ही माहिती मिळवत आहे. सर्व ऑनलाइन व काही ऑफलाइन व्यवहारसुद्धा इथे पाहायला मिळत आहेत! अॅप्स, गेम्स, फोन्स, फ्लिपकार्ट/अमेझॉन सारख्या वेबसाइट्सवरील सर्व खरेदीची इथे एका जागी नोंद केलेली दिसेल! ही माहिती खाजगी ठेवली जात असल्याचा दावा मात्र गूगल करायला विसरल नाहीये.

फेसबुकवर सध्या चाललेला माहिती गोला करण्याचा गोंधळ सुरू असताना आता गूगलकडून सुरू असलेल्या या माहिती गोळा करण्याबद्दलच्या बातमीने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मात्र गेली अनेक वर्षे या सर्व मोठ्या कंपन्या हेच करत आल्या असून ग्राहकांना/यूजर्स न सांगता त्यांचा डेटा कलेक्ट करणं व नंतर प्रकरण उघडकीस आल्यावर माफी मागून ते मिटवणं हल्ली सर्रास पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टी यूजर्सच्या दृष्टीने अजिबातच चांगल्या नसल्या तरी ही डेटाची खरेदी विक्री येथून पुढेही सुरूच राहील. मोठ्या कंपन्यांवर किमान प्रमाणात होत असणारी कारवाई आशेचा किरण दाखवणारी असली तरी येणार्‍या काळात याच डेटा/माहितीचं राज्य असणार आहे हे मात्र नक्की…

Search Terms : Google uses Gmail to track a history of things you buy with Purchases option!

Exit mobile version