हुवावे आता स्मार्टफोन्स विक्रीत अॅपलला मागे टाकत दुसर्‍या स्थानी!

हुवावे (Huawei) या चीनी कंपनीने २०१९ च्या सुरूवातीस अॅपलला स्मार्टफोन विक्रीमध्ये मागे टाकत आता दुसरं स्थान पटकावलं आहे. सॅमसंग अजूनही पहिल्या स्थानी कायम आहे! ज्या वेगाने हुवावेची विक्री सुरू आहे त्यानुसार त्यांनी सॅमसंगलाही मागे टाकल्यास आश्चर्य वाटायला नको!

नेटवर्किंगमध्ये प्रामुख्याने वावर असलेल्या या कंपनीने गेल्या काही वर्षात स्मार्टफोन्समध्ये जम बनवण्यास सुरवात केली आणि आता थेट अॅपलला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकाची कंपनी बनली आहे! हुवावेने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के वाढ नोंदवली आहे असं IDC मार्फत सांगण्यात आलंय! इतर कंपन्यांचे विक्रीचे आकडे घसरत असताना हुवावेने मात्र चक्क वाढ दर्शवली आहे!

हुवावेचे स्मार्टफोन निर्मिती जगामध्ये आघाडी मिळवण्याच कायमच ध्येय राहिलं आहे. अमेरिकेमध्ये मात्र त्यांना सध्या अडचणी असून अमेरिका चीन यांच्या व्यावसायिक युद्धामुळे त्यांना तिथे पूर्ण ताकदीनिशी प्रवेश करता येत नाहीये. शिवाय हुवावेवर नेहमीच चीनी सर्व्हर्सद्वारे हेरगिरी करत असल्याचा आरोप होतो. ग्राहकांच्या फोन्सची महत्वाची माहिती चीनकडे पुरवली जात असल्याच वारंवार म्हटलं जातं. (जे खरतर आता सर्वच चीनी कंपन्यांबाबत होत आहे.) अमेरिकेन बाजारात प्रवेश मिळाल्यास मात्र हुवावे पहिल्या क्रमांकावर सहज पोहचू शकेल…!

हुवावेने स्मार्टफोन कॅमेरा, प्रोसेसरमध्ये आणलेलं नवं तंत्रज्ञान त्यांना चांगलं यश मिळवून देत आहे. अलीकडेच त्यांनी सादर केलेला Huawei P30 Pro सध्या प्रचंड चर्चेत आहे. याच्या कॅमेराने तब्बल 50X हायब्रिड झुम करता येतं! उत्तम डिस्प्ले व उत्कृष्ट कॅमेरामुळे हा फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे! असं तांत्रिक नावीन्य प्रदर्शित करत असल्यामुळेचं इतरांना मागे टाकणं यांना शक्य झालं आहे

Exit mobile version