रिट्विटसोबतही फोटो, GIF, व्हिडिओ जोडण्याची सोय उपलब्ध!

अलीकडे ट्विटर या लोकप्रिय सोशल मीडिया/ मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवर अनेक नव्या सोयी उपलब्ध होत आहेत. याची सुरुवात ट्विटमध्ये वापरता येणार्‍या अक्षरांची मर्यादा १४० वरून २८० करण्यापासून झाली होती म्हणायला हरकत नाही. आता रिट्विट म्हणजे दुसर्‍या यूजरचं ट्विट आपल्या टाइमलाइनवर ट्विट करताना कमेंट सोबत फोटो/GIF/व्हिडिओ जोडण्याची सोय देण्यात आली आहे!

ही सोय गेल्या दोन दिवसांपासून iOS, अँड्रॉइड व मोबाइल वेबसाइटवर उपलब्ध झाली आहे. वरवर लहान दिसणारा हा बदल ट्विटरवर मोठा बदल घडवू शकेल. नेहमी प्रमाणे अनेकांनी याही सुविधेला विरोध दर्शवला आहे पण पुन्हा एकदा सवय झाली की याकडे कोणाचं लक्ष जात नाही. सध्या लोक मोठ्या प्रमाणात रिट्विटचा पर्याय निवडतात. या रिट्विटसोबत मूळ ट्विटवर प्रतिक्रिया केवळ टेक्स्टद्वारेच देणं आजवर शक्य होतं आता मात्र आपण त्यासाठी फोटो, GIF व व्हिडिओसुद्धा वापरू शकणार आहोत.

यामुळे ट्विटरवर नुसत्या टेक्स्ट ऐवजी इमेजेस, GIF, व व्हिडिओ दिसण्याच प्रमाण मात्र वाढणार हे नक्की…! एडिट बटनची मात्र मागणी अजूनही प्रलंबितच आहे. तूर्तास हा पर्याय वापरता येईल…

Search Terms Twitter launching the ability to Retweet with GIF, photos, and video!

Exit mobile version