अॅपल WWDC 2019 : iOS 13, मॅक प्रो, macOS कॅटॅलिना जाहीर!

अॅपलचा वार्षिक डेव्हलपर कार्यक्रम WWDC 2019 कालपासून सुरू झाला असून अॅपल कंपनी या कार्यक्रमात त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम व सॉफ्टवेअर संबंधित अपडेट्स बद्दल माहिती जाहीर करते. यंदा त्यांनी आयफोनसाठीच्या iOS ओएसची नवी आवृत्ती iOS 13, आयपॅडसाठी आता iOS ऐवजी iPadOS नावाने ओएस, मॅक प्रो या शक्तिशाली कम्प्युटरची घोषणा, कम्प्युटर व लॅपटॉपची ओएस मॅकओएसची नवी आवृत्ती कॅटॅलिना यांच्यासोबत इतरही बरेच अपडेट्स जाहीर करण्यात आले आहेत!

iOS 13 : आयओएस या अॅपल आयफोन्ससाठी असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमची नवी आवृत्ती जाहीर करण्यात आली असून या आवृत्तीपासून अॅपलच्या फोन्सवर डार्क मोड उपलब्ध करून देण्यात येत आहे! यामुळे सेटिंग्स, अॅप्स सगळीकडे नेहमीच्या पांढर्‍या पर्यायासोबत डोळ्यांचा त्रास कमी करणारा व बॅटरी वाचवणारा डार्क मोड दिलेला आहे.
मेसेजेससाठी नव्या स्वाईप टेक्स्टची सोय, शेअर करताना नेहीमच्या वापरातील कॉन्टॅक्टची यादी वर दिसेल. म्युझिक अॅपमध्ये लिरिक मोड देण्यात येत असून यामुळे सुरू असलेल्या गाण्याचे शब्द फोनवर दिसतील! मेमोजीसाठीही अपडेट्स देण्यात येणार असून यामध्ये आता मेकअपसाठी विविध पर्याय पाहण्यास मिळतील!
मॅप्समध्येही बर्‍याच नव्या सोयी जोडल्या जात असून सर्च केलेल्या जागेचा स्ट्रीट व्हयूद्वारे ३६० अंशात काढलेला फोटो पाहता येईल!
फोटोज अॅपमध्ये नवा सॉर्ट मोड देण्यात येतोय जो आपल्याला आपले सर्व फोटो तारीख, महिना, वर्ष यानुसार वर्गीकरण करण्यास मदत करेल!
हे नवं अपडेट जुलै महिन्यापासून यूजर्सना उपलब्ध होईल.

सुरक्षिततेसाठी अॅपल साईन इन सारखे पर्याय : अॅपलने गेली काही वर्षं गोपनीयता व सुरक्षितता यांच्याकडे खास लक्ष देत त्यानुसार अॅप्सना देण्यात येणार्‍या परवानगीसाठी खास पर्याय दिले आहेत. आता अॅप्स कितीवेळा तुमच्या लोकेशनची माहिती घेऊ शकेल याचं नियंत्रण देण्यात आलं आहे.
शिवाय अॅपल स्वतःची Sign In सेवा उपलब्ध करून देत असून यामुळे यूजर्सना स्वतःची वैयक्तिक माहिती न देता अॅप्समध्ये साइन इन करता येईल! यासाठी आपला ईमेल लपवण्याचाही पर्याय असून त्यामध्ये अॅपल आपल्यासाठी विविध अक्षरे व अंक यांचं मिश्रण करून वेगळा ईमेल आयडी देईल जो आपल्या मुख्य ईमेलला फॉरवर्ड केलेला असेल!

सिरीचा आवाज आता अधिक नैसर्गिक : अॅपलच्या सिरी या व्हॉईस असिस्टंटमधील आवाज आता न्यूरल इंजिनचा वापर करून अधिक नैसर्गिक असणार आहे. टेक्स्ट टू स्पीच प्रकार आता खर्‍या व्यक्तीने बोललं आहे इतक स्पष्ट वाटेल असा दावा अॅपलने केला आहे!

आयपॅडसाठी आता iPad OS सादर : अॅपलने अलीकडे त्यांच्या आयपॅडवर खास लक्ष देत त्याच्यासाठी स्वतंत्र ओएस तयार केली आहे. ही iOS प्रमाणेच असली तरी यामध्ये खास मोठ्या स्क्रीनचा लाभ घेतील असे ड्रॅग ड्रॉप सारखे बरेच पर्याय जोडण्यात आले आहेत! शिवाय आता आयपॅडला यूएसबी पेनड्राइव्ह, कॅमेरासुद्धा जोडता येणार आहे!

MacOS Catalina 10.15 : मॅकओएस कॅटॅलिना ही अॅपलच्या डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिमची नवी आवृत्ती असणार आहे. यामध्ये जुन्या आयट्यून्स (iTunes) ला निरोप देऊन नव्याने तीन स्वतंत्र अॅप्स जे अॅपल म्युझिक, पॉडकास्ट व टीव्ही या नावाने ओळखले जातील. मॅक आता आयपॅडला मॉनिटर प्रमाणे वापरण्यास सपोर्ट देईल! यामुळे मॅकबुकला टचस्क्रिन पर्याय उपलब्ध होईल! याला अॅपलने साईडकार (Sidecar) असं नाव दिलं आहे!

SwiftUI : अॅपलच्या स्विफ्ट या कोडिंग भाषेमधून डेव्हलपिंग करण्यासाठी नवे पर्याय उपलब्ध. डेव्हलपर्स बराच वेळ वाचवत अधिक चांगलं कोडिंग करता येईल असे बदल!

मॅक प्रो : हा शक्तिशाली कम्प्युटर सादर करून अॅपलने क्रिएटर्सना नक्कीच खुश केलं आहे. यामध्ये चक्क 1.5TB रॅम, बसवता येऊ शकते! 28 Cores असलेला इंटेल प्रोसेसर, 8 PCIe Slots, 2 Radeon Vega II GPU, 1400 Watt पॉवर सप्लाय देण्यात आला आहे! याच्या सुरुवातीच्या मॉडेलचीच किंमत $5999 आहे! Mac Pro बद्दल अधिक माहितीसाठी लेख
यासोबत Pro Display XDR हा डिस्प्लेसुद्धा सादर, या ३२ इंची 6K मॉनिटर डिस्प्लेची किंमत $5000 असेल

टीव्ही ओएस व वॉचओएससाठी नवे अपडेट्स देण्यात आले आहेत. टीव्हीओएसला मल्टीयूजर सपोर्ट मिळेल. वॉचओएससाठी स्वतंत्र अॅप स्टोअर जाहीर!

Exit mobile version