माइनक्राफ्टला रे ट्रेसिंग सपोर्ट : भन्नाट ग्राफिक्स पहायला मिळणार!

माइनक्राफ्ट ही जगातल्या सर्वात लोकप्रिय गेम्सपैकी एक असून ही गेम जगात पीसीसाठी आजवर सर्वाधिक विकल्या गेलेल्या गेम्समध्ये आघाडीला आहे. मे महिन्यात या गेमला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. अजूनही ७.४ कोटी लोक दरमहा ही गेम खेळत आहेत! मायक्रोसॉफ्टने २०१४ मध्ये माइनक्राफ्टची डेव्हलपमेंट पाहणार्‍या मोजांग कंपनीचं तब्बल 2.5 बिलियन डॉलर्स खर्चून अधिग्रहण केलं होतं!

Minecraft मध्ये अनेक उपलब्ध ब्लॉक्समधून आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण माइनक्राफ्ट शहर तयार करू शकतो! यामध्ये काही खास गुणवत्ता असलेल्या ब्लॉक्समुळे तर अमर्याद शक्यता निर्माण करता येतात. आपली कल्पनाशक्ती वापरुन हव्या तशा इमारती बनवा, त्यामध्ये कार्टद्वारे फिरण्याची सोय करा, बाण/तलवारी वापरुन गेममधील शत्रूंसोबत लढा असं अगदी काहीही करता येतं! अनेक कल्पक गेमर्सनी तर पूर्ण शहरंसुद्धा या गेममध्ये उभी केली आहेत!

अर्थात ह्या गेममध्ये सर्व गोष्टी ब्लॉक्स (ठोकळे) मध्ये दिसतात. त्यामुळे यामध्ये वास्तविक जगातील लूक येणार नाहीच. गेमच मुळात ब्लॉक्स आधारित संकल्पनेवर आहे. या गेममध्ये वास्तविकता आणता येणार नाही असा समज् असतानाच काल मायक्रोसॉफ्ट व एनव्हीडिया यांनी एकत्र येत या गेमला Nvidia Ray Tracing सपोर्ट देत असल्याचं जाहीर केलं! यामुळे गेममध्ये दिसणारा सूर्यप्रकाश, खोल्या/गुहांमध्ये परावर्तित होणारा प्रकाश, सावल्या, एकंदर वातावरण सोबत सोनं, काच असे ब्लॉक्स आता त्यांचे खरे वास्तविक गुण असतील तसेच दिसतील. आधी सोन्याचा ब्लॉक केवळ पिवळा ठोकळा दिसायचा आता मात्र खरोखर सोन्यासारखा दिसेल! खरखुरं पाणीसुद्धा पहायला मिळेल! अनेक वर्षं माइनक्राफ्ट खेळणाऱ्या/बिल्ड करणाऱ्या लोकाना नक्कीच हे नवं रूप आवडणार आहे.

मात्र यासाठी Nvidia चं नवीन Ray Tracing सपोर्ट असलेलं ग्राफिक्स कार्ड वापरावं लागणार आहे. नवे RTX मालिकेतील GPU ह्या सुविधेला सपोर्ट करतात. आता अनेक गेम्सना हा सपोर्ट जाहीर करण्यात आला असून Nvidia अधिकाधिक गेम्सना यामध्ये जोडण्याच्या प्रयत्नात आहे. रे ट्रेसिंग तंत्रज्ञानातील पाथ ट्रेसिंगचा वापर करून हे भन्नाट दृश्य आपण माइनक्राफ्टमध्ये अनुभवू शकतो.

Ray Tracing हे Nvidia ने त्यांच्या GPU/ग्राफिक्स कार्डमध्ये अंतर्भूत केलेलं तंत्रज्ञान असून याद्वारे गेम्स किंवा 3D फिल्म्समध्ये आपल्याला रियल टाइम सावल्या आणि प्रकाश render करून पहायला मिळतात. आपण जसा माऊस फिरवून दिशा बदलू त्याबरोबर प्रकाश आणि वस्तूंच्या सावल्यासुद्धा बदलेलल्या पहायला मिळतील. यामुळे वास्तविक जगात दिसणारं दृश्य गेममध्येही उभं करणं शक्य होतं! Path Tracing द्वारे rendering engine प्रकाश कोणत्या पडत आहे गेम कॅरक्टरची दिशा कुठे आहे याचा लाईव्ह अभ्यास करून त्यानुसार प्रकाश दिसेल!

खालील व्हिडिओ नक्की पहा

Exit mobile version