इंस्टाग्रामवर नवं कॅमेरा डिझाईन : डार्क मोड, क्रिएट मोडचा समावेश!

गेले काही दिवस इंस्टाग्रामवर अनेक नव्या फीचर्सची जोड दिली जात असून आज आता अनेक महीने न बदललेल्या स्टोरीज मधील कॅमेराचं डिझाईन बदलण्यात आलं आहे. या नव्या कॅमेरा डिझाईनमुळे इफेक्टस आणि फिल्टर्स सहज वापरता येतील असं इंस्टाग्राम प्रमुख Adam Mosseri यांनी सांगितलं आहे. क्रिएट मोडमध्ये स्टीकर्समधील पर्याय वापरता येणार असून यासाठी आधी फोटो काढलेला नसला तरी चालेल. याद्वारे आपण आपल्या स्टोरीच्या बॅकग्राउंडसाठी GIF अॅनिमेशनचाही वापर करू शकाल.

मराठीटेकला इंस्टाग्रामवर फॉलो करा : https://www.instagram.com/marathitech

सध्या अनेक अॅप्सचा डार्क मोड उपलब्ध करून देण्याचा ट्रेंड आता इंस्टाग्रामवरही पाहायला मिळेल. पांढऱ्या रंगातील मेन्यू, इंटरफेसमुळे डोळ्यांना होणार त्रास लक्षात घेत आता डेव्हलपर्स आवर्जून डार्क मोडचा समावेश करत आहेत. यामुळे काही प्रमाणात बॅटरीसुद्धा वाचते. या डार्क मोडला यूजर्सचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे. आता याची गरज होती ती इंस्टाग्रामला आणि सरतेशेवटी कालपासून इंस्टाग्रामवर डार्क मोड उपलब्ध झाला आहे. सध्यातरी हा डार्क मोड Android 10 आणि iOS 13 वापरणाऱ्यांनाच पाहता येईल. येत्या काळात आणखी फोन्सना ही सोय उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी System wide डार्क मोड सुरू केलेला हवा आहे जो तुम्ही Settings > Display मध्ये जाऊन सुरू करू शकाल.

https://twitter.com/mosseri/status/1181361666992115719

याशिवाय आणखी एक विशेष बदल इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल तो म्हणजे यापुढे Following Tab दिसणार नाही. या टॅबमध्ये आपण फॉलो करत असलेल्या यूजर्सने कुठे कमेंट केली, कोणता फोटो लाइक केला की लगेचच पाहता येत होतं. मात्र याचा गैरवापर होत असल्याचं लक्षात आलं आहे. सर्वच यूजर्सना त्यांची इंस्टाग्राम अॅक्टिविटी इतराना समजत आहे याची माहिती नव्हती म्हणून हे फीचर काढणं योग्य ठरेल असं इंस्टाग्रामकडून सांगण्यात आलं आहे. ही टॅब २०११ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती.

https://twitter.com/mosseri/status/1181288498654924803

चारच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामने थ्रेड्स नावाचं स्वतंत्र अॅप सादर केलं असून आपल्या जवळच्या मित्रांसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ते सादर करण्यात आलं आहे.

Exit mobile version