याहू ग्रुप्स होणार बंद : इंटरनेटवर एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या सेवेचा अस्त!

Yahoo Groups ही काही वर्षांपूर्वी बऱ्याच इंटरनेट युजर्सकडून वापरली जाणारी लोकप्रिय सेवा आता बंद करण्यात येणार असून १४ डिसेंबरपासून याहू ग्रुप्सवरील कंटेंट डिलीट करण्यास सुरवात होईल. २१ ऑक्टोबरपासून या साईटवर कंटेंट अपलोड करण्याची सोय बंद झाली आहे. याहू ग्रुप्स हजारो विषयांवर वेगवेगळे ग्रुप्स सुरू असायचे ज्यावर मोठी चर्चा घडायची. एकमेकांची मते, काही गोष्टी करण्यासाठी मदत घेतली/दिली जायची. आता फेसबुक, रेडिट सारख्या पर्यायांमुळे कालांतराने याहू ग्रुप्स सेवा याहूच्या इतर सेवांप्रमाणे कमी कमी होत आज बंद होण्याची स्थितीला आलेली आहे. इथे काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी अॅक्टिव असणारे ग्रुप्ससुद्धा बंद झालेले पाहायला मिळतात.

गूगल, फेसबुकच्या आधीचा काळ AOL, MSN, याहू यांच्या विविध सेवांनी गाजवला होता. यांची जागा कालांतराने इतर पर्यायानी घेतली. इंटरनेटच्या वेगवान जगात कोणीच कायम टिकू शकत नाही याची ही उदाहरणं. त्याकाळी जर कोणी असं म्हटलं असतं की याहूच्या या सेवा बंद होत जातील तर कोणी विश्वास ठेवला नसता. आता याहू कंपनीची मालकी व्हेरीझॉन (Verizon) या टेलीकॉम कंपनीकडे आहे. याहूच्या फ्लिकर (Flickr) या प्रसिद्ध फोटो शेअरिंग साईटचं स्मगमग (SmugMug) या फोटो होस्टिंग सर्व्हिसकडून अधिग्रहण झालं आहे. गेली कित्येक वर्षं याहूकडे असलेली फ्लिकर इंस्टाग्राम पूर्वी सर्वात प्रसिद्ध फोटो शेअरिंग साईट होती!

याहू ग्रुप्समधून सध्या खालील गोष्टी काढून टाकण्यात येणार आहेत :

आधीच्या ऑर्कूट, याहू मेसेंजर, Friendster, पासून ते अगदी अलीकडच्या Vine, गूगल प्लस पर्यंत बऱ्याच साइट्सना काळाच्या ओघात कमी प्रतिसादामुळे वेबसाइट्स बंद कराव्या लागल्या आहेत. या सर्वांचे ऐन भरात असताना लाखों वापरकर्ते होते. इंटरनेटच्या इतिहासात यांचा उल्लेख मात्र कायम होत राहील…

Exit mobile version