अॅपल मॅकबुक प्रो आता १६ इंची डिस्प्लेसह : नव्या किबोर्डची जोड!

अॅपलने गेल्या काही मॅकबुक प्रो मॉडेल्समध्ये जोडलेला बटरफ्लाय किबोर्ड अनेकांना आवडला नव्हता. शेवटी ग्राहकांची मागणी ऐकत अॅपलने नव्या १६ इंची मॅकबुक प्रोसोबत नव्या किबोर्डचा समावेश केला आहे. या किबोर्डला त्यांनी मॅजिक किबोर्ड असं नाव दिलं आहे. नव्या लॅपटॉपमध्ये मोठा डिस्प्ले, सुधारित थर्मल डिझाईन पाहायला मिळेल.

किबोर्डच्या नव्या डिझाईनचं अनेकांनी स्वागत केलं असून यामध्ये नवं मेकॅनिझम असून 1mm की ट्रॅव्हल असेल. टचबारवरील एस्केप बटन अनेक वेळा चालत नसल्याने आता बाजूला स्वतंत्र बटन देण्यात आलं आहे. शिवाय टचआयडी आता पॉवर बटनमध्येच असेल.

थर्मल डिझाईनसुद्धा सुधारण्यात आलं असून यामुळे लॅपटॉपच्या इंटर्नल्सदरम्यान २८ टक्के अधिक हवा खेळत राहील. ज्याच्यामुळे लॅपटॉप क्लिष्ट कामे करतानाही गरम होणार नाही. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये लॅपटॉप गरम झाल्यास कामगिरी कमी केली जायची ज्यावर मोठी टीका झाली होती. नव्या मॉडेलमधील हिटसिंक ३५ टक्के अधिक मोठा आहे.

भारतामध्ये बेस मॉडेल्सच उपलब्ध होणार असून CPU आणि GPU नुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील.

बेस मॉडेल १ ज्याची किंमत १,९९,९०० पासून सुरू असेल. यांच्या भारतीय किंमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही.

CPU: 6-core 9th Gen Intel Core i7 processor clocked at 2.6 GHz (Turbo Boost up to 4.5 GHz)
GPU: AMD Radeon Pro 5300M with 4 GB of GDDR6 memory
Memory: 16 GB of DDR4 RAM
Storage: 512 GB SSD
Display: 16-inch IPS LED-backlit Retina display (3072 x 1920)
Battery: 100 WHr

बेस मॉडेल २ ज्यामध्ये CPU आणि स्टोरेज अधिक मिळेल

CPU: 8-core 9th Gen Intel Core i9 processor clocked at 2.3 GHz (Turbo Boost up to 4.8 GHz)
GPU: AMD Radeon Pro 5500M with 4 GB of GDDR6 memory
Storage: 1 TB SSD

https://youtu.be/ysRigNyavF4
Exit mobile version