सोनीचा वॉकमन आता नव्या रूपात अँड्रॉइडसह उपलब्ध!

सोनीने कॅसेटच्या काळात प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या पण नंतर नंतर आयपॉडसमोर मागे पडत गेलेल्या वॉकमनचं नवं रूप आता सादर केलं असून हे काल भारतात सादर झालं आहे! Sony NW-A105 Walkman हा डिजिटल मीडिया प्लेयर युजर्सच्या आठवणींना उजाळा तर देईलच शिवाय सर्वोत्तम ऑडिओ गुणवत्तेसह संगीत ऐकण्याचा आनंदसुद्धा देईल! यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असून टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत भारतात २३९९० इतकी असणार आहे.

सोनीच्या या नव्या वॉकमनमध्ये 16GB स्टोरेज असेल जे MicroSD कार्डचा वापर करून 128GB पर्यंत वाढवता येइल. यामध्ये USB Type C पोर्ट असू याद्वारे फास्ट चार्जिंगची सोय देण्यात आली आहे. ऑडिओच्या उत्तम गुणवत्तेसाठी विविध पर्याय उपलब्ध असून Type C पोर्ट, ब्ल्युटूथ व 3.5mm ऑडिओजॅक द्वारे आपण संगीत ऐकू शकाल.

यामध्ये अँड्रॉइडचं 9.0 Pie हे व्हर्जन असून यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची अॅप्ससुद्धा इंस्टॉल करू शकता. प्रामुख्याने Spotify, Saavn, Gaana सारख्या अॅप्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या विविध ऑडिओ फीचर्सचा उपयोग करून घेता येईल. जे नेहमीच्या सर्वच फोन्सवर शक्य होईल असे नाही. यामध्ये 3.6 इंची टचस्क्रीन आहे. रेजोल्यूशन 1280×720 आहे आणि वायफायद्वारे आपण अॅप्स, गाणी, संगीत, फाइल्स डाउनलोड करू शकतो. थोडक्यात हा एक अँड्रॉइड फोनच असून यामध्ये फक्त सिम नेटवर्कद्वारे कनेक्शन उपलब्ध नाही. याची बॅटरी एका चार्जवर तब्बल २६ तास चालेल!

हा नवा वॉकमन २४ जानेवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. वरून फोनसारखाच दिसत असला तरी हा ऑडिओ संदर्भात अनेक गोष्टींनी सुसज्ज आहे!

Exit mobile version