iQOO 3 5G सादर : विवोच्या सबब्रॅंडचा भारतात पहिला फोन!

आणखी एक ब्रॅंड भारतीय स्मार्टफोन बाजारात दाखल!

विवोने आता त्यांच्या चीनमधील iQOO (आयकू) या सबब्रँडची भारतात स्वतंत्र ओळख करून दिली असून या याअंतर्गत त्यांनी आज त्यांचा पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. हा भारतातला दुसरा 5G फोन असेल. ओप्पोने त्यांच्या रियलमी सबब्रँडमार्फत अफाट यश मिळवल्यानंतर विवोनेही त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. सुरुवातीलाच जाहिरातीसाठी त्यांनी थेट विराट कोहलीलाच आणलं आहे. त्यावरून येत्या काळात ह्या ब्रँडद्वारे बाजारात भक्कम स्थान मिळवण्याची विवोची इच्छा दिसून येते. विवो व ओप्पो या दोन्ही कंपन्यांची मालकी BBK Group कडे आहे त्यामुळे या अंतर्गत स्पर्धेने त्यांना या ना त्या मार्गाने फायदाच होत राहणार आहे.

या आधीच्याही लेखात सांगितल्याप्रमाणे 5G फोन्स सादर करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असली तरी खरेदी करताना केवळ फोन 5G आहे म्हणून खरेदी करू नका कारण भारतात 5G ग्राहकाना उपलब्ध होण्यास अनेक महिन्यांचा (कदाचित वर्षांचा) कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी 5G फोनमध्ये असण्याचा काहीही उपयोग नाही.

iQOO 3 5G

डिस्प्ले : 6.44″ Super AMOLED Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865
GPU : Adreno 650
रॅम : 12GB LPDDR5
स्टोरेज : 256GB UFS 3.1
कॅमेरा : 48MP Quad Camera + 13MP Telephoto + 13MP Ultrawide & Macro Lens + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4440mAh 55W SuperFlash Fast Charge कॅप्सुलसारख डिझाईन
ऑपरेटिंग सिस्टिम : iQOO UI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.0, In Display Fingerprint Scanner, NFC, Dolby Atmos, HDR10+
नेटवर्क : 5G, 4G
सेन्सर्स : Dual GPS, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor
रंग : Volcano Orange, Silver, Black
किंमत : हा फोन फ्लिपकार्टवर ४ मार्च दुपारी १२ पासून उपलब्ध होत आहे.
8GB+128GB 4G ₹ ३६९९०
8GB+256GB 4G ₹ ३९९९०
12GB+256GB 5G ₹ ४४९९०

अपडेट (०४-०३-२०२०) या फोनची विक्री आज पासून सुरू होत आहे. http://fkrt.it/ZpvFR6uuuN

Exit mobile version