करोनामुळे Byju, Unacademy तर्फे ऑनलाइन शिक्षण मोफत!

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. देशात इतरत्रसुद्धा अशा प्रकारचा निर्णय झाला असून यावर डिजिटल माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्याना ऑनलाइन शिक्षण पुरवणाऱ्या कंपन्यानी त्यांच्या वेबसाइटवरील सर्व शैक्षणिक कोर्सेस सर्वांना मोफत उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये Byju’s, Unacademy, Toppr, Catalyst Group यांनी पुढाकार घेतला आहे.

याद्वारे शिक्षण मोफत करून दिल्यावर Byju’s च्या ऑनलाइन ट्रॅफिकमध्ये (वेबसाइट पाहणाऱ्यांच्या संख्येत) तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जाहीर केली आहे! दिव्या गोकुलनाथ (Byju’s सहसंस्थापक) यांनी असं सांगितलं आहे की या COVID19 च्या संकटादरम्यान विद्यार्थ्याना आम्ही बायजूवरील लर्निंग प्रोग्राम्स एप्रिल महिना संपेपर्यंत डाउनलोड करून मोफत वापरता येतील! या निर्णयानंतर नव्या विद्यार्थ्यांचं अॅप डाउनलोड करण्याचं प्रमाण ६० टक्क्यानी वाढल्याचं त्यांनी सांगितलं आहे!

या ऑनलाइन लर्निंग सेवांमुळे विद्यार्थी घरबसल्या इंटरनेटवर विविध गोष्टी ऑनलाइन शिकू शकतील. जेणेकरून त्यांचं करोनापासून संरक्षणही होईल आणि इतक्या दिवसांचा वेळही वाया जाणार नाही!

अनअकॅडेमीचे सह संस्थापक गौरव मुंजाळ यांनी अशी माहिती दिली आहे की करोनामुळे शैक्षणिक व्यवस्थेलाही मोठा धक्का बसला असून यासाठी आम्ही आमचा प्लॅटफॉर्म देशातील शैक्षणिक संस्थासाठी खुला करत आहोत ज्यामुळे ते विद्यार्थ्याना ऑनलाइन शिकवू शकतील! सध्याची परिस्थिती सुधारेपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय वापरता येईल!

कॅटॅलिस्ट ग्रुप जो प्रामुख्याने स्पर्धा परीक्षासाठी वापरला जातो त्याचे प्रमुख अखंड स्वरूप पंडित यांनीही त्यांच्या वेबसाइटवर ३०-४० टक्क्यानी प्रवेश वाढले आहेत अशी माहिती दिलीय. कॉलेज, टयूशन, कोचिंग क्लासेससुद्धा बऱ्याच अंशी बंद झाल्यामुळे असं होत आहे असं मत त्यांनी नोंदवलं आहे.

मराठीटेकतर्फे आमचंही असं आवाहन आहे की करोनाचा प्रसार थांबावा या दृष्टीने सर्वांनी घरीच थांबलेलं उत्तम आहे.
मात्र घरीसुद्धा वेळ वाया न घालवता अशा प्रकारे ऑनलाइन पर्याय वापरुन विविध उपयोगी गोष्टी शिका
जेणेकरून या वेळेचा फायदा करून घेता येईल. यूट्यूब यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

Seach Terms : Online Learning Website make their content free to download for everyone as schools, coaching classes face shut downds due to Corona Virus/COVID19 Outbreak

Exit mobile version