OnePlus 8 व 8 Pro सादर : आता वायरलेस चार्जिंग, 120Hz डिस्प्लेसह!

वनप्लस या प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आघाडीवर असलेल्या कंपनीची OnePlus 8 स्मार्टफोन मालिका आज सादर झाली असून यावेळी OnePlus 8 व OnePlus 8 Pro हे दोन फोन लॉंच झालेत आहेत. या 8 Pro चं वैशिष्ट्य म्हणजे 30W वायरलेस चार्जिंग. सोबत Flouid AMOLED HDR10+ सपोर्ट असलेला डिस्प्ले, 48MP कॅमेरा (ट्रिपल कॅमेरा सेटअप), डॉल्बी साऊंड, चांगलं सॉफ्टवेअर, डिस्प्लेमध्येच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर, अधिक वेगवान वार्प चार्ज तंत्रज्ञान, अधिक रॅम या गोष्टी फोनसोबत देण्यात आलेल्या आहेत. जाहीर केल्याप्रमाणे यामध्ये आता 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत OnePlus Bullets Wireless Z ही वायरलेस हेडफोन्स जाहीर झाले आहेत.

सध्या या फोनची भारतीय किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. OnePlus 8 Lite हा फोन जाहीर होईल असं म्हटलं जात होतं मात्र या फोनबद्दल काही बोलण्यात आलं नाही. वनप्लस ब्रॅंड सुरुवातीला मध्यम किंमतीत फोन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध होता मात्र आता किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. शिवाय वरून भारतात फोनवरील GST सुद्धा वाढवण्यात आला आहे त्यामुळे किंमती आणखी वाढतील!
अपडेट : OnePlus 8 Pro भारतात ₹54,999 पासून मिळेल तर OnePlus 8 ची किंमत ₹41,999 पासून सुरू आहे

OnePlus 8 Pro

डिस्प्ले : 6.78″ Fluid AMOLED QHD+ 120Hz HDR10+ Support 3D Corning Gorilla Glass, 3168 x 1440 pixels 513ppi 10bit
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon™ 865
5G Chipset: X55
GPU: Adreno 650
रॅम : 8GB/12GBB LPDDR5
स्टोरेज : 128GB/256GB UFS3.0
कॅमेरा : 48MP f/1.6 with Dual OIS Sony IMX689 + 8MP Telephoto Lens + 48MP Wide Angle Lens + 5MP Color Filter Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP Sony IMX689
बॅटरी : 4510 mAh with Warp Charge 30T Fast Charging (5V/6A) + 30W Wireless Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS based on Android™ 10
इतर : 4×4 MIMO, Supports up to DL Cat 18 / UL Cat 13(1.2Gbps / 150Mbps), 2×2 MIMO, Wi-Fi 802.11 a / b / g / n / ac / ax, 2.4G / 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, support aptX & aptX HD & LDAC & AAC, NFC, GPS (L1+L5 Dual Band), GLONASS, Galileo (E1+E5a Dual Band), Beidou, SBAS, A-GPS, USB 3.1 GEN1, Type-C, Dolby Atmos
सेन्सर्स : In-display Fingerprint, Accelerometer, Electronic Compass, Gyroscope, Ambient Light, Proximity, Sensor Core, Laser, Flicker-detect, Front RGB sensor
रंग : Glacial Green, Ultramarine Blue, Onyx Black

किंमत : (अपडेट १९-०४-२०२० : OnePlus 8 मालिकेतील फोन्सच्या भारतीय किंमती जाहीर)
8GB+128GB ₹54,999 (OnePlus 8 Pro)
12GB+256GB ₹59,999 (OnePlus 8 Pro)
6GB+128GB ₹41,999 (OnePlus 8)
8GB+128GB ₹44,999 (OnePlus 8)
12GB+256GB ₹49,999 (OnePlus 8)

Exit mobile version