ट्विटर सीईओ जॅक डॉर्सी यांची तब्बल ७५९८ कोटींची मदत जाहीर !

ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया वेबसाइट आणि स्क्वेर (Square) या डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्या कंपनीचे प्रमुख जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी आज कोरोना व इतर संबंधित गोष्टींसाठी तब्बल 1 Billion Dollars म्हणजे जवळपास ~७५९८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे! त्यांची एकूण संपत्ती (3.6 Billions Dollars म्हणजे २७३५२ कोटी) पैकी २८% रक्कम ते यासाठी देणार आहेत. त्यांच्या स्क्वेर कंपनीमधील हिस्सा विकून Start Small LLC नावाच्या संस्थेद्वारे ही मदत केली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यावर ही संस्था मुलींच्या आरोग्य व शिक्षणासाठी काम करेल.

तुलना करायचीच म्हटलं तर फेसबुक प्रमुख मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स किंवा जेफ बेझोस हे जॅक डॉर्सीपेक्षा अनेक पटींनी श्रीमंत आहेत. मात्र तरीही जॅकने एव्हढी मोठी संपत्ती या सेवेसाठी देणं म्हणजे मोठं धाडसच आहे. यासाठीचं स्पष्टीकरणही जॅकने त्याच्या ट्विटर थ्रेडमध्ये लिहिलं आहे. twitter.com/jack वर तुम्ही ते वाचू शकाल. यासाठी त्याने ट्विटरऐवजी स्क्वेरमधील हिस्सा वापरला आहे कारण ट्विटरपेक्षा स्क्वेर मधील हिस्सा अधिक आहे.

त्याने ही मदत कशा प्रकारे वापरली जात आहे हे दर्शवण्यासाठी एक गूगल शीटसुद्धा अपलोड केलं आहे. याद्वारे आत्ता अमेरिकन फूड फंडला दिलेली मदत दिसत आहे. COVID-19 चा संबंध संपल्यावर ही स्टार्ट स्मॉल संस्था मुलींचं आरोग्य व शिक्षणासाठी काम पुढे सुरू ठेवेल.

हे इतकं मोठं पाऊल आत्ताच उचलण्याचं कारण सांगताना त्याने असं सांगितलं आहे की “सध्या समाजाच्या गरजा त्वरित भागवायला हव्या आहेत आणि मला माझ्या मदतीचा झालेला परिणाम या आयुष्यात पाहायचा आहे! मला आशा आहे की यामुळे इतर अनेकांना प्रेरणा मिळेल. आयुष्य खूप लहान आहे म्हणून लोकांना मदत करण्यासाठी आपण जे करू शकतो ते आज करूया”

Search Terms Twitter & Square CEO Jack Dorsey to donate $1 billion to fund CORONA relief

Exit mobile version