Windows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय!

मराठीटेकच्या या व्हिडिओमध्ये पाहुया तुमच्या विंडोज १० कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर करत टायपिंग कसं करायचं … हा Windows 10 वर मराठी भाषेत टाइप करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअर/टूल डाउनलोड करत बसण्याची गरज नाही. अपडेटमधील फोनेटिक किबोर्डचा वापर आपण करणार आहोत जो आता विंडोज १० मध्येच समाविष्ट करण्यात आला आहे!

याचा वापर करून तुम्ही फेसबूक, जीमेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस (एक्सेल, पॉवरपॉईंट, वर्ड), फॉटोशॉप, इ. सॉफ्टवेअरमध्येदेखील मराठीत टाइप करू शकता आणि जर तुम्ही “Google” असं टाइप केलं तर “गूगल” असे दिसेल. म्हणजेच तुम्हाला टाइप करायचा असेल त्या शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग लिहा आणि मराठी शब्द टाइप झालेला दिसेल ! आहे न कमाल ?

Search Terms : Marathi Typing in Windows 10 Using Phonetic Keyboard for Indic Languages Transliteration

Exit mobile version