अलीकडेच उपलब्ध झालेल्या iOS 16 अपडेटमध्ये ॲपलने स्वतः आयफोनवर transliteration साठी मराठी भाषेचा सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता आयफोन्स व आयपॅडवरसुद्धा सहज सोप्या पद्धतीने मराठी भाषेत टाइप करता येईल.
Transliteration मुळे टाइप करत असलेल्या शब्दांचं इंग्रजी स्पेलिंग लिहिलं की शब्द मराठीत टाइप होतो! उदा. तुम्ही या किबोर्डवर maharashtra असं स्पेलिंग टाइप केलं की महाराष्ट्र असं टाइप झालेलं दिसेल! यामुळे मराठीत टाइप करण्याचा वेग बऱ्याच पटीत वाढतो कारण आपल्याला कोणतं मराठी अक्षर कुठे आहे हे किबोर्डकार शोधात बसावं नाही.
- आयफोनच्या Settings मध्ये जा
- आता General
- त्यानंतर Keyboard
- आता Keyboards
- आलेल्या यादीत marathi सर्च करा
- आता दोन पर्याय दिसतील त्यातील Transliteration हा पर्याय निवडा
- आता हा किबोर्ड ॲड झाला आहे.
- आता नोट्स किंवा इतर कोणत्याही app मध्ये जा
- टॅप करताच आलेल्या किबोर्डच्या डाव्या कोपऱ्यात खाली असलेल्या आयकॉनला लाँग प्रेस करा
- आलेल्या यादीत Marathi A→अ हा किबोर्ड निवडा
- आता तुम्ही सोप्या पद्धतीने मराठी भाषेत टाइप करू शकता.
यापूर्वी उपलब्ध असलेला देवनागरी किबोर्डमध्ये थेट मराठी अक्षरेच किबोर्डवर दिसायची मात्र आता त्यासोबत हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. तुमच्या आयफोन व आयपॅडमध्ये iOS 16 अपडेट डाउनलोड करून इंस्टॉल केलेलं असेल तरच हा नवा पर्याय तुम्हाला दिसेल. याला आधी Gboard चा पर्याय होता मात्र त्यालाही प्रत्येक शब्द टाइप केल्यावर सिलेक्ट करावा लागतो. आता अधिकृत ॲपलनेच हा सोपा पर्याय दिला आहे.
या नव्या मराठी किबोर्डबद्दल आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरही एक व्हिडिओ प्रकाशित केला आहे.
हा व्हिडिओ तुमच्या आयफोन, आयपॅड वापरणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेयर करा.