Xiaomi Mi 10 5G व Mi TV Box 4K भारतात सादर!

अनेक महिने पुढे ढकलल्यानंतर शायोमीने त्यांचा Mi 10 5G भारतात सादर केला आहे. यामध्ये 108MP कॅमेरा, Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर, 6.67 इंची AMOLED Display, 30W Wireless Charging देण्यात आलं आहे. यासोबत टीव्हीला जोडून त्यामध्ये स्मार्ट सुविधा देणारा Mi TV Box 4K सुद्धा भारतात आणला आहे. 4K HDR 10 सपोर्ट, Android TV 9.0, Dolby Audio, Chromecast Ultra अशा सुविधा यामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
Mi 10 5G प्रि ऑर्डर करणाऱ्यांना २४९९ किंमतीची Mi Wireless Power bank मोफत मिळणार आहे.

Xiaomi Mi 10 5G

डिस्प्ले : 6.67″ 3D Curved E3 AMOLED Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865
GPU : Adreno 650
रॅम : 8GB LPDDR5
स्टोरेज : 128GB/256GB UFS 3
कॅमेरा : 108MP Quad Camera + 13MP Ultrawide + 2MP Depth + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 20MP
बॅटरी : 4780mAh 30W Fast Wired & Wireless Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 11 based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, WiFi 6, In Display Fingerprint Scanner, 2 SIM Slot
सेन्सर्स : Proximity Sensor, Light Sensor, G Sensor, Electronic compass, Gyroscope, Hall IC, Barometer, Infrared Sensor
रंग : Twilight Grey, Coral Green
किंमत :
8GB+128GB ₹49999
8GB+256GB ₹54999

Mi TV Box 4K द्वारे तुम्ही तुमचा नॉन स्मार्ट टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवू शकता. यामध्ये असलेल्या Android TV मुळे यामध्ये आपण अँड्रॉइड अॅप्ससुद्धा इंस्टॉल करू शकतो. Netflix, Prime Video, Disney+ Hotstar आणि YouTube आधीपासून समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये ब्ल्यूटुथ, वायफाय, यूएसबी पोर्ट, Audio Output, HDMI पोर्ट देण्यात आलं आहे. याची किंमत ३४९९ आहे. हा ११ मे पासून फ्लिपकार्ट आणि शायोमीच्या वेबसाइट व दुकानांमध्ये उपलब्ध होईल. सोबत शायोमीने Mi True Wireless Earphones 2 सुद्धा भारतात आणले असून यांची किंमत ४४९९ इतकी आहे.

सध्या भारतात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चीनी फोन्स आणि कंपन्याविरोधातील मोहीम पाहता शायोमी फोन्सची मागणी काही प्रमाणात कमी होऊ शकते. भारतीय स्मार्टफोन कंपन्या जवळपास नाहीशा झाल्या असल्या तरी सॅमसंग सारख्या चीनी नसलेल्या कंपनीला प्राधान्य द्यावं असं या मतप्रवाहात सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच फोन्सवरील नवीन GST लागू झाल्यामुळे आधीच फोन्सच्या किंमती वाढल्या आहेत तर आता शायोमी ज्या कंपनीची ओळख स्वस्त फोन्ससाठी आहे त्यांनीही ५०००० च्या आसपास किंमतीत फोन्स सुरू केल्यामुळे ग्राहक आणखी नाराज आहेत.

Exit mobile version