महाजॉब्स : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पोर्टल सुरू : रोजगारासंबंधित ऑनलाइन सेवा

MahaJobsPortal

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स पोर्टल‘चं लोकार्पण केलं.

Mahajobs Portal Website Official Link : https://mahajobs.maharashtra.gov.in

महाजॉब्स हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणार्‍यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते अशी माहिती याबद्दल देण्यात आली आहे.

नोकरी शोधक नोंदणी | Jobseeker Registration : https://mahajobs.maharashtra.gov.in/Candidate/Registration
उद्योजक नोंदणी Employer Registration : https://mahajobs.maharashtra.gov.in/Employers/Registration

सध्या COVID19 च्या संकटामुळे अनेक उद्योगांना कामगारांची कमतरता जाणवत आहे. तसेच याच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत. यावर थेट राज्य सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आलं असून यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या स्थानिकांना नोकरी शोधणं सोपं होणार आहे. उद्योगांना सुद्धा यामुळे कामगारांची शोधाधोध करावी लागणार नाही. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.अर्थात हे पोर्टल फक्त उद्योजक आणि कामगार यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार आहे.

महाजॉब्स वेबसाइटवरील माहितीनुसार या पोर्टलची उद्दिष्ट्ये :

या पोर्टलवर नोंदणी कशी करायची याची अधिक माहिती पोर्टलवरच वाचायला मिळेल. वर दिलेल्या लिंकवर जाऊन तुमची माहिती देऊन तुम्ही नोंदणी करू शकता. इथे दिलेल्या अधिकृत लिंक सोडून इतर कुठेही Mahajobs साठी नोंदणी करू नका.

Search Terms: Mahajobs portal launched by CM Uddhav Thackeray, How to apply for job in Mahajobs, How to register in Mahajobs

Exit mobile version