MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

गूगल फॉर इंडिया : गूगल लेन्स, असिस्टंट, बोलो अॅप आता मराठीत!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 19, 2019
in Events, News

गूगल फॉर इंडिया हा कार्यक्रम गूगलचे भारतीय वापरकर्त्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी आयोजित केला जातो. Google For India मध्ये यंदाच्या पाचव्या वर्षीही बऱ्याच नव्या गोष्टी आणल्या असून मराठी भाषेतही अनेक सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गूगलने बेंगळुरूमध्ये AI Lab स्थापन केली असून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अभ्यास करून त्याद्वारे देशातील दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोधण्याचं काम करणार आहे. लॅब सुरु करत असल्याचं जाहीर केलं आहे. आजच्या या लेखामध्ये काही विशेष उत्पादनांविषयी माहिती देण्यात आली आहे त्यांची ओळख करून घेऊया…

गूगल लेन्स (Google Lens) : या खास सुविधेद्वारे आपण आपल्या फोनच्या कॅमेराचा वापर करून बऱ्याच गोष्टी करू शकतो जसे की भाषांतर, वस्तु/प्रेक्षणीय स्थळे/फुले/पदार्थ ओळखणे. फोटो काढून त्यामधील टेक्स्ट स्कॅन करून त्याची माहिती सांगणे किंवा सर्च करणे, इ. तर आता ही गूगल लेन्स सुविधा मराठीत सुद्धा उपलब्ध होत असून यामुळे तुम्ही तुमचा फोन तुम्हाला माहीत नसलेल्या भाषेतला फलक/जाहिरातीकडे करून स्कॅन केल्यास तो मराठीत भाषांतर करून दाखवेल!

ADVERTISEMENT

बोलो (Bolo) : हे अॅप लहान मुलांना भाषा शिकवण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने बनवण्यात आलं असून याद्वारे वाचन, उच्चार सुधारणे हा उद्देश असेल. हिंदी व इंग्लिशमध्ये सादर झालेलं हे अॅप आता मराठीत सुद्धा उपलब्ध झालं आहे. सोबत बंगाली, तामिळ, तेलुगू, उर्दूमध्येसुद्धा हे उपलब्ध होत आहे. यामध्ये वेगवेगळ्या कथा, गोष्टींचा सुद्धा समावेश आहे! आजवर ८ लाख मुलांनी याचा लाभ घेतला आहे अशी माहिती गूगलने दिलीय!

गूगल असिस्टंट (Google Assistant) : या स्मार्ट व्हॉइस असिस्टंटमध्ये आता अनेक नव्या सोयी खास भारतीय यूजर्ससाठी जोडण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच हा असिस्टंट मराठीत उपलब्ध झाला आहे. यावेळी असं जाहीर करण्यात आलं आहे कि भारतीय यूजर्समध्ये गूगल असिस्टंटचा वापर करण्याचं प्रमाण वाढत असून याचा सर्वाधिक वापर करण्यात हिंदी आता इंग्लिशनंतर जगातली दुसरी भाषा ठरली आहे.

आता गूगल असिस्टंटला वेगळी भाषा आणि फोनसाठी वेगळी भाषा निवडता येईल. सर्च करताना गूगल असिस्टंटला ओके गूगल स्पीक टू मी इन मराठी असं सांगा त्यापुढे असिस्टंट तुमच्याशी मराठीत बोलेल!

गूगल असिस्टंट आता इंटरनेटशिवायसुद्धा वापरता येणार असून ही सुविधा तूर्तास व्होडाफोन आयडिया ग्राहकांसाठीच आहे. यासाठी तुम्हाला 8009191000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रश्न विचारून गूगलकडून उत्तरे मिळवता येतील! क्रिकेट स्कोर विचारा, हवामान विचारा, अगदी काहीही…!

लवकरच गूगल असिस्टंटला बोलून आपल्याला डॉमिनोजचा पिझ्झा मागवता येईल, ओलाद्वारे कॅब बुक करता येईल!

गूगल सर्च डिस्कव्हर (Google Search Discover) : आपण गूगल सर्चमध्ये असताना डावीकडे स्वाईप केल्यावर आपल्याला आपण सर्च केलेल्या गोष्टींवर आधारित लेख पाहायला मिळतात. यासाठी गूगल Discover या सेवेचा वापर करतं आता ही मराठीतसुद्धा उपलब्ध होत आहे. यामुळे यापुढे तुम्हाला केवळ इंग्लिश कंटेंट ऐवजी मराठी बातम्या, लेख पाहायला मिळतील.

गूगल पे (Google Pay) : गूगल पे या गूगलच्ये पेमेंट सेवेमध्ये त्यांनी अनेक नव्या सोयी जाहीर केल्या आहेत. गेल्या वर्षभरात गूगल पेच्या यूजर्समध्ये तिप्पट वाढ झाली आहे. वार्षिक 110 बिलियन डॉलर्सचे व्यवहार आता या अॅपद्वारे पार पडत आहेत.

  • Spot Platform : ही एक नवी सेवा गूगल पे उपलब्ध करून देत असून यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक यांना त्यांच्या ग्राहकांना खरेदीसाठी सोपा पर्याय उपलब्ध करून देता येईल. UrbanClap, Goibibo, MakeMyTrip, RedBus, Eat.Fit व Oven Story हे सध्या या सेवेचा वापर करत आहेत. याद्वारे विक्रेत्यांना त्यांची उत्पादने सहजरित्या दाखवता येतील आणि विक्रीसुद्धा करता येईल यासाठी वेगळ्या अॅप/वेबसाइटची गरज उरणार नाही.
  • Google Pay for Business : हे नवं अॅप खास विक्रेते/दुकानदार/व्यावसायिकांसाठी असून याद्वारे त्यांना त्यांच्या बिझनेससाठी पेमेंट पर्याय उपलब्ध करून देता येईल. पैसे स्वीकारणे त्यांची नोंद ठेवणं अधिक सोपं जाईल.
  • Tokenized cards : यामुळे पैसे देताना आपल्या कार्ड नंबर ऐवजी एका डिजिटल टोकनचा वापर केला जाईल ज्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित व गोपनीय राहतील.
  • Google Pay Jobs : गूगलने स्किल इंडिया अंतर्गत National Skills Development Corporation सोबत भागीदारी करून गूगल पे अॅपद्वारे नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची सोय दिली आहे. यासाठी काही कंपन्यासोबत गूगल काम करणार असून आपण आपली माहिती देऊन आपल्याला योग्य अशा जॉबचा शोध गूगल पेमध्येच घेऊ शकू…!
Google Pay Jobs

search terms Google For India Google Assistant Now in Marathi Discover Google Pay India Small Businesses Google Pay Jobs Search Spot Platform Bolo Google Lens

Tags: BOLOBusinessGoogle AssistantGoogle For IndiaGoogle IndiaGoogle LensGoogle PayJobsMarathi
Share11TweetSend
Previous Post

सॅमसंग Galaxy M30s व M10s सादर : तब्बल 6000mAh बॅटरी, sAMOLED डिस्प्ले!

Next Post

फ्रेंड्सला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गूगलची गंमत!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
Google India Trends

भारतीयांनी २०२२ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? : गूगल इयर इन सर्च

December 13, 2022
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
Friends Google Easter Egg

फ्रेंड्सला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गूगलची गंमत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!