JioMeet सादर : जिओची व्हिडिओ कॉलिंग सेवा : झुमची कॉपी?

कोविड १९ मुळे वाढलेलं व्हिडिओ कॉलिंगचं प्रमाण आणखी काही महीने तरी नक्कीच वाढलेलं असणार आहे. प्रमुख कंपन्यानी त्यांच्या सेवांमध्ये बदल केले तर आता रिलायन्स जिओसारखी नवी कंपनीसुद्धा यामध्ये स्वतःची JioMeet नावाची सेवा आणत आहे! लोकप्रिय झूम सोबत स्पर्धा करण्यासाठी जिओमीट आता सज्ज झालं आहे. ही सेवा आता सर्वांसाठी उपलब्ध झाली असून अँड्रॉइड, iOS, विंडोज आणि ब्राऊजरमध्येही ही सेवा वापरता येईल! यामध्येही एकावेळी १०० पर्यंत लोक ऑनलाइन व्हिडिओ मीटिंगसाठी सहभागी होऊ शकतात! सोबत कॉलिंगची वेळ एका कॉलसाठी मोफत सलग २४ तासांपर्यंत आहे!

JioMeet Download Link : https://jiomeetpro.jio.com/home

११ आठवड्यात ११ गुंतवणूकदारांकडून तब्बल ११७५८८ कोटी उभे केल्यानंतर जिओ प्लॅटफॉर्म्सद्वारे ही जिओमीट सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या चीनी अॅप्सविरोधात सुरू असलेली कारवाई लक्षात घेता अतिशय योग्य वेळी रिलायन्सने हे पाऊल उचललं आहे आणि साहजिकच आधीच लोकप्रिय असलेल्या जिओच्या माध्यमातून त्यांना मोठा ग्राहकवर्ग मिळेलच.

जिओमीटमध्ये मोफत एचडी व्हिडिओ कॉल्स करता येणार असून ग्रुप कॉलसाठी आपण १०० लोकांना एकावेळी ऑनलाइन सहभागी करून घेऊ शकाल! कॉलसाठी वेळेची मर्यादा नाही म्हणायला हरकत नाही. मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त invite link वर क्लिक करून ब्राऊजरमध्ये उघडायची आहे.

काल ही सेवा उपलब्ध झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर हे सुद्धा पोस्ट करायला सुरवात केली की झूम आणि जिओमीटचा युजर इंटरफेस पूर्णतः मिळताजुळता आहे. अगदी लोगो, मेन्यू, डिझाईन सर्वच ठिकाणी साधर्म्य! आता यावर पुढे काही बदल होतील का ते नंतर समजेलच…

JioMeet बद्दल अधिक माहिती : https://jiomeetpro.jio.com/webhelp

Exit mobile version