रिलायन्स जिओ फायबरचे आता Truly Unlimited डेटा प्लॅन्स!

रिलायन्स जिओने त्यांची जिओ फायबर ब्रॉडब्रॅंड सेवा सादर केल्यापासून असलेले प्लॅन्स मर्यादित इंटरनेट डेटा पुरवत होते. इंटरनेट प्लॅन्सचा स्पीड जास्त असला तरी त्यांना डेटाची मर्यादा असल्यामुळे अनेकांना ते पसंतीस पडले नाहीत. परिणामी या सेवेला जिओच्या 4G सेवांना मिळालेला प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र जिओने या सेवेमध्ये अमर्याद डेटा देण्याचा निर्णय घेतला असून १ सप्टेंबर २०२० पासून हे नवे प्लॅन्स उपलब्ध होत आहेत. या अनलिमिटेड डेटा प्लॅन्सची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होणार आहे!

नव्या प्लॅन्समुळे जिओची आता एयरटेल ब्रॉडब्रॅंड आणि इतर स्थानिक ब्रॉडब्रॅंड कंपन्याना चांगलीच स्पर्धा निर्माण झालेली दिसेल. सध्या ब्रॉडब्रॅंड सेवा पुरवणाऱ्या कंपन्याची काळजी वाढवणारे हे प्लॅन्स असून येत्या काळात पुन्हा एकदा जिओ विरुद्ध सर्व कंपन्या असं चित्र पाहायला मिळू शकतं!
या नव्या प्लॅन्समध्ये जिओ अनलिमिटेड इंटरनेट डेटासोबत अनलिमिटेड मोफत व्हॉईस कॉल्स, OTT अॅप्सचं सबस्क्रिप्शन सुद्धा देणार आहे! १ सप्टेंबर २०२० पासून हे नवे प्लॅन अंमलात येतील. जुने प्लॅन्स बंद करून हे प्लॅन सुरू झालेले पहायला मिळतील असं TelecomTalk या वेबसाइटवरील माहितीनुसार सांगण्यात आलं आहे! या प्लॅन्स JioFiber Home Tariff Plans असं म्हटलं जाणार आहे.

नवे जिओ फायबर प्लॅन्स खालीलप्रमाणे असतील :

या प्लॅन्सवर १८% GST लागू असेल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी jio.com/fiber.html पाहू शकता.
वरील प्लॅन्सची किंमत ही एका महिन्यासाठी असून वार्षिक प्लॅन्सबद्दल माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. त्याबद्दल माहिती मिळताच लेख अपडेट केला जाईल.

यासोबत जिओने मोफत ट्रायल देणार असल्याचंसुद्धा जाहीर केलं आहे. यामध्ये ३० दिवसांसाठी 150Mbps इंटरनेट डेटा, मोफत कॉलिंग, 4K Set Top Box सोबत 10 OTT अॅप्सचं सबस्क्रिप्शन मोफत मिळेल!

Exit mobile version