ॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध!

काही दिवसांपूर्वी ॲमेझॉनने इको स्पीकर्स, Luna नावाची क्लाऊड गेमिंग सर्व्हिस आणि त्यांच्या रिंग कंपनी अंतर्गत उडणारा सिक्युरिटी कॅमेरा आणला आहे. त्यासोबतच फायर टीव्ही स्टिकच्याही नवी आवृत्ती उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये नवा प्रोसेसर आणि सुधारित ऑडिओ मिळेल. त्यांनी आता फायर टीव्ही लाइट हे नवं स्वस्त मॉडेलसुद्धा आणलं आहे! यामुळे ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिक लोकांपर्यंत पोहचेल असं ॲमेझॉनतर्फे सांगण्यात आलं आहे.

फायर टीव्ही स्टिक हे असं उपकरण आहे जे आपण आपल्या टीव्हीला जोडून त्याद्वारे इंटरनेट वरील मालिका, चित्रपट, Apps, Games, गाणी पाहू शकता.

Fire TV Stick : ही नेहमीची फायर टीव्ही स्टिक आता ५० टक्के सुधारित कामगिरी करू शकेल आणि त्याचवेळी आधीच्या तुलनेत याला ५० टक्के कमी पॉवर लागेल! डिझाईन सारख असलं तरी नवा 1.7GHz quad core प्रोसेसर जोडण्यात आला असून हे स्ट्रीमिंग डोंगल आता 1080p व्हिडिओ 60fps मध्ये HDR सपोर्टसह प्ले करू शकेल! सोबत डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहेच. याची किंमत ३९९९ अशी असणार आहे आणि हा १५ ऑक्टोबर पासून उपलब्ध होईल.
Link : https://amzn.to/2HG3hUV

Fire TV Stick Lite: ही नवी फायर टीव्ही स्टिक स्ट्रीमिंगसाठी स्वस्त पर्याय असणार आहे. यामध्येही 1080p व्हिडिओ HDR सपोर्टसह पाहता येतील. याचंही डिझाईन नेहमीच्या फायर टीव्ही स्टिक प्रमाणेच आहे मात्र याच्या रिमोटमध्ये पॉवर, म्यूट आणि वॉल्यूम कमी जास्त करण्याची बटन्स देण्यात आलेली नाहीत!
याची किंमत २९९९ अशी असणार आहे आणि हा १५ ऑक्टोबर पासून उपलब्ध होईल.
Link : https://amzn.to/348AuQ8

ॲमेझॉनने जाहीर केलेल्या माहितीनुसार ॲमेझॉन आता हिंदीनंतर तमिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या भाषांमध्येही उपलब्ध होत आहे. मराठी भाषेचा मात्र अजूनही समावेश करण्यात आलेला नाही. याबाबत तुम्ही ट्विटरवर जाऊन @amazon, @amazonIN, @amazonHelp, @AmitAgarwal या हँडल्सना टॅग करून मागणी करू शकता. अधिकाधिक लोकांनी मागणी केल्यास लवकरच मराठीचा सुद्धा पर्याय आलेला दिसेल.

Exit mobile version