ॲमेझॉन फायर टीव्हीवर आता लाईव्ह टीव्ही चॅनल्स पाहता येणार!

Amazon Fire TV Live TV

ॲमेझॉन फायर टीव्ही या टीव्हीला जोडून त्यावर चित्रपट, मालिका पाहण्याच्या स्ट्रीमिंग स्टिक उपकरणाद्वारे आपण आता लाईव्ह टीव्ही चॅनल्ससुद्धा पाहू शकणार आहात. नव्या Live Tab द्वारे स्ट्रीमिंग ॲप्समधील सर्व लाईव्ह वाहिन्या एका जागी दिसतील. यामध्ये चॅनल गाईड्ससुद्धा असून यामुळे सध्या सुरू असलेले कार्यक्रम सहज पाहता येतील! ही सोय सध्या वापरत असलेल्या सर्वांना आजपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ॲमेझॉनने यासाठी SonyLIV, Voot, Discovery+ आणि NexG TV यांच्यासोबत भागीदारी केली आहे. यांच्या वाहिन्या आता दिसू लागतील लवकरच Zee5 सुद्धा येणार आहे पर्यायाने झीच्या वाहिन्यासुद्धा लवकरच लाईव्ह पाहता येतील. यामध्ये इंग्लिश व हिंदी सोडून इतर भाषात अद्याप वाहिन्या दिसत नाहीत. मात्र लवकरच येतील अशी शक्यता आहे.

अजूनही बऱ्याच जणांच्या फायर टीव्हीवर ही नवी सोय दिसत नाही. येत्या काही आठवड्यात सर्वांना ही सोय मिळेल असं ॲमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे.

जर तुमच्याकडे फायर टीव्ही स्टिक नसेल तर १६ ऑक्टोबरपासून ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये यावर मोठी ऑफर असणार आहे त्यावेळी खरेदी करू शकता.

तुम्ही अलेक्सा असिस्टंटला Alexa Watch DD National अशी आज्ञा देऊन तो चॅनल लावू शकता!

Search Terms : How to watch live tv channels on amazon fire tv amazon launches live tv feature on fire tv

Exit mobile version