जिओचा आता JioPages नावाचा मेड इन इंडिया वेब ब्राऊजर !

सध्या उपलब्ध असलेल्या अनेक ब्राऊजर्सच्या गर्दीत आता भारतीय ब्राऊजर म्हणवत आता जिओचा Jio Pages नावाचा ब्राऊजर आला आहे. हा क्रोमियम आधारित ब्राऊजर असून यामध्ये मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा प्रामुख्याने भारतीयांना समोर ठेऊन बनवण्यात आला आहे असं सांगण्यात आलं. हा प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध झालेला आहे.

Download JioPages on Google Play : play.google.com/store/apps/details?id=com.jio.web

या ब्राऊजरमध्ये वेगवेगळ्या थीम्ससुद्धा वापरता येतील. शिवाय डार्क मोडचा पर्याय आहेच. आपल्याला आवडेल असे विषय सेट केल्यावर त्या संबंधित नोटिफिकेशन्स मिळतील.

आपल्या राज्य, भाषेनुसार आपल्याला कंटेंट दाखवला जाणार आहे. डाउनलोड्सची प्रकारानुसार वर्गवारी करता येणार आहे. सोबत ॲडब्लॉकरसुद्धा दिलेला आहे.

हा ब्राऊजर खरतर आधीही उपलब्ध होताच मात्र त्याचं नाव जिओ ब्राऊजर असं होतं.

  1. Personalized Home Screen
  2. Personalized theme
  3. Personalized Content
  4. Informative Cards
  5. Regional Content
  6. Advanced Download Manager
  7. Incognito Mode
  8. Ad Blocker

आणखी एक भारतीय पर्याय आलेला असला तरी तुम्ही हा वापरलाच पाहिजे असं नाही. तुम्ही सध्या गूगल क्रोम वापरत असाल शक्यतो तेच वापरणं सुरू ठेवा. अन्यथा फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज हे पर्याय आहेतच. डेटा नियंत्रण, सपोर्ट आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे तीन पर्याय महत्वाचे आहेत.

जिओने आता टेलीकॉम क्षेत्रातील बऱ्यापैकी सर्वच गोष्टी ताब्यात घेतल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी Qualcomm सोबत 5G ची यशस्वी चाचणी सुद्धा घेतली आहे!

Exit mobile version