प्रत्येक विंडोज लॅपटॉप/पीसीमध्ये उपलब्ध असलेल्या मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊजरमध्ये आता Copilot Mode उपलब्ध झाला असून यामुळे हा ब्राऊजरसुद्धा आता Agentic Browser म्हणून ओळखला जाईल. ब्राऊजरमध्ये उजव्या कोपऱ्यात address bar च्या बाजूला Copilot बटन आलेलं दिसेल त्यावर क्लिक करून आपण यामधील सोयी वापरू शकता. हा ब्राऊजर विंडोज, macOS, iOS व अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.
Download Link aka.ms/copilot-mode
Copilot Mode म्हणजे काय?
Microsoft Edge मध्ये आलेला Copilot Mode हा तुमच्या कामात मदत करणारा AI असिस्टंट आहे.
- तुम्ही एकाच वेळी अनेक टॅब उघडले असतील तर Copilot त्यांचा सारांश करून देतो.
- फॉर्म्स आपोआप भरून देणे, हॉटेल बुकिंगसारखी कामे पूर्ण करणे किंवा तुमच्या मागील ब्राउझिंगवरून पुढील सूचना देणे हेही तो करू शकतो.
- माइकद्वारे बोलून ब्राउझिंग करणे, टॅब्समधील माहिती जोडून समजावून सांगणे आणि तुमच्या प्रोजेक्ट्सची “Journeys” नावाने आठवण ठेवणे ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.
- एजंट मोड (Copilot Mode) ब्राउझरमध्ये तुमचं काम थेट Copilot ला द्यायचं झालं तर Copilot मदत करेल उदाहरणार्थ, तुम्हाला एखादी पार्टी आयोजित करायची असेल तर Copilot मध्ये अमुक अमुक वस्तू शोध, कार्टमध्ये भर आणि ऑर्डर दे किंवा एखादी फ्लाइट/हॉटेल शोधून बुक कर अशी कामं ते ऑनलाइन स्वतः करून देऊ शकतो.
वापरकर्त्यांसाठी फायदे
- वेळ वाचतो: लांबलचक लेख किंवा रिपोर्ट्स वाचण्याऐवजी Copilot त्याचा थोडक्यात सारांश देतो.
- काम सोपे होते: फॉर्म्स, पासवर्ड मॅनेजमेंट, बुकिंग किंवा शॉपिंगसारखी कामे थेट ब्राउझरमधून आपोआप पूर्ण होतात.
- वैयक्तिक अनुभव: तुमच्या ब्राउझिंग पद्धतीनुसार Copilot सूचना देतो.
सुरक्षितता आणि नियंत्रण
Copilot Mode मध्ये प्रायव्हसी कंट्रोल्स दिले आहेत. म्हणजेच तुमच्या परवानगीशिवाय तो तुमची browsing history वापरत नाही. तसेच, AI आधारित सुरक्षा फीचर्समुळे फसवणूक करणाऱ्या साइट्सपासून संरक्षण मिळते.
इतर Agentic Browsersशी तुलना
आज AI ब्राउझरची स्पर्धा जोरात आहे. Microsoft Edge Copilot Mode व्यतिरिक्त काही नवे ब्राउझर चर्चेत आहेत:
- Perplexity Comet: हा ब्राउझर Perplexity कंपनीतर्फे आणला असून सध्याचा लोकप्रिय Agentic ब्राऊजर आहे.
- ChatGPT Atlas : हा OpenAI ने बनवलेला ब्राऊजर असून यामध्ये ChatGPT अंतर्भूत आहे.
- Microsoft Edge : पूर्वीच्याच Edge ब्राऊजरमध्ये आता Copilot ची जोड देऊन त्याला Agentic Browser बनवलं आहे.
- Dia Browser: हा आणखी एक उपलब्ध असलेला Agentic ब्राउझर आहे. सध्या फक्त macOS वर उपलब्ध
मायक्रोसॉफ्टने OpenAI मध्ये मोठी गुंतवणूक केलेली असून त्यांनी Atlas जाहीर केल्यावर काहीच दिवसात मायक्रोसॉफ्टने Copilot Mode जाहीर केला आहे. यामध्ये ChatGPT चंच तंत्रज्ञान आणि मॉडेल्स (आत्ता GPT 5) वापरले आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, Edge Copilot Mode हा मायक्रोसॉफ्टचा चांगला प्रयत्न आहे. पुढील काही वर्षांत ब्राउझर म्हणजे फक्त इंटरनेट उघडण्याचं साधन न राहता, तुमच्यासोबत काम करणारा खरा डिजिटल साथीदार ठरणार आहे. लवकरच क्रोममध्येही अशा सोयी मिळतील आणि Brave ने सुद्धा तसे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. आता फक्त Apple Safari आणि Firefox यांनी अद्याप अशा सोयीबाबत माहिती दिलेली नाही.
Copilot Mode कशाप्रकारे काम करतं हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा…










