नासाचं पर्सिव्हिअरन्स मंगळावर : अनेक बाबतीत प्रथमच थेट मंगळावरून!

NASA Rover On Mars

नासाच्या पर्सिव्हिअरन्स (Perseverance) रोव्हरने १८ तारखेला यशस्वी लॅंडींग करून छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी येत असलेले फोटो लँड करण्याच्या वेळेपासून मिळाले असून यापूर्वी कधीही अशा प्रकारे फोटो काढण्यात आले नव्हते अशी माहिती नासाने दिली आहे. २४ तासांनी हे फोटो जगासमोर प्रकाशित करण्यात आले आहेत.

पर्सिव्हिअरन्सला घेऊन ॲटलास रॉकेटनं अमेरिकेतल्या केप कॅनॅव्हरल, फ्लोरिडा येथील एयर फोर्स स्टेशनवरून गेल्यावर्षी जुलै महिन्यात उड्डाण केलं होतं. त्यानंतर ते १८ फेब्रुवारी २०२१ ला मंगळ ग्रहावर उतरलं आहे. हा रोव्हर शेकडो वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी नदी असेल अशी शक्यता वर्तवली जाते अशा ठिकाणी उतरवण्यात आला असून तेथील गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याकाळी असलेल्या जीवसृष्टीच्या शक्यतेची पडताळणी करण्यात हे महत्वाचं पाऊल ठरेल.

नासाने या रोव्हरवर तब्बल २५ कॅमेरा आणि २ मायक्रोफोन्स बसवले आहेत. या पूर्वीच्या नासाच्याच Curiosity रोव्हरपेक्षा अधिक चांगले कॅमेरा यावेळी बसवण्यात आले असून मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग आता अधिक सुस्पष्टपणे पाहता येईल. Ingenuity नावाचं छोटं हेलिकॉप्टरसुद्धा यामध्ये जोडण्यात आलं आहे जे हवामान पाहून उडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या मोहिमेचं नियंत्रण भारतीय वंशाच्या डॉ. स्वाती मोहन यांनी केलं. लँड होत असतानाची प्रक्रियासुद्धा त्यांनी जाहीर केली. संबंधित लाईव्हस्ट्रीम लिंक : https://youtu.be/gm0b_ijaYMQ

या रोव्हरने पाठवलेले अधिकृत फोटो पाहण्यासाठी https://twitter.com/NASAPersevere या लिंकवर जा

भारताचा मंगळावर रोव्हर लँड करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता मात्र येत्या काही वर्षात भारत पुन्हा एकदा प्रयत्न करणार असून MOM-2 मोहीम मात्र केवळ orbital म्हणजे मंगळाभोवती फिरत राहण्याच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील गोष्टी ठरवण्यात येतील असं इस्रो प्रमुखांनी आज सांगितलं आहे. यशस्वी मोहिमेबद्दल त्यांनी नासाचं अभिनंदन केलं आहे.

Exit mobile version