फ्लिपकार्टकडून Cleartrip चं अधिग्रहण : आता ट्रॅव्हल बुकिंगमध्येही सहभाग!

भारतातील आघाडीची ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज क्लियरट्रिप (Cleartrip) या ट्रॅव्हल बुकिंग कंपनीमध्ये १०० टक्के हिस्सा विकत घेऊन अधिग्रहीत करत असल्याचं जाहीर केलं आहे. क्लियरट्रिप, हॉटेल, रेल्वे बुकिंगची ऑनलाइन सेवा पुरवते.

क्लियरट्रिप ही भारतातल्या सर्वात जुन्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी कंपनीपैकी एक आहे. या अधिग्रहणामुळे फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी असलेल्या डिजिटल कॉमर्स सेवा आणखी जोमाने काम करतील. यांमध्ये झालेल्या करारानुसार क्लियरट्रीपमधील सर्व कामकाज फ्लिपकार्टकडे हस्तांतरित होईल. क्लियरट्रिप हा स्वतंत्र ब्रॅंड म्हणूनच काम करेल आणि त्यांचे कर्मचारीसुद्धा त्यांचं काम करत राहतील.

फ्लिपकार्टने आजवर अधिग्रहीत केलेल्या कंपन्यामध्ये आता क्लियरट्रिपचं नाव जोडलं जाईल. सध्या फ्लिपकार्टकडे Myntra, PhonePe, eBay India, Ekart, Jeeves आणि Jabong यांची मालकी आहे.

क्लियरट्रिपसुद्धा त्यांच्या सेवांसाठी प्रसिध्द असून त्यांची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. Hrush Bhatt, Matthew Spacie आणि Stuart Crighton यांनी मिळून विमान आणि हॉटेल बुकिंगसाठी कंपनीची सुरुवात केली होती. अलीकडे कोरोना मुळे त्यांच्या व्यवसायाला बऱ्यापैकी फटका बसलेला आहे. त्यातच MakeMyTrip आणि GoIbibo यांचं झालेलं मर्जर (एकत्र येणं) यामुळे त्यांची स्पर्धा सुद्धा आणखी वाढली आहे.

Exit mobile version