realme चे C20, C21 आणि C25 भारतात सादर : किंमत ६९९९ पासून

रियलमी त्यांच्या स्वस्त फोन्ससाठी असलेल्या C मालिकेत आता ३ नवे फोन्स सादर केले आहेत. यांची किंमत ६९९९ पासून सुरू होऊन १०९९९ पर्यंत जाते. realme C21 १४ एप्रिल पासून आणि realme C25 १६ एप्रिल पासून खरेदीसाठी realme.com, Flipkart आणि दुकानांमध्ये उपलब्ध होतील. काही दिवसांपूर्वीच रियलमीने त्यांचे Narzo आणि realme 8 मालिकेतील नवे फोन्स सादर केले होते तेव्हढयात आता लगेच आणखी नवे पर्याय आले आहेत.

Realme C20 : या फोनमध्ये 6.5″ HD+ LCD डिस्प्ले, 1600x720p रेजोल्यूशन, MediaTek Helio G35 प्रोसेसर, 2GB रॅम, 32GB स्टोरेज, 8MP कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 10W चार्जिंग, Android 10 अशा सुविधा मिळतील. या फोनची किंमत ६९९९ इतकी आहे. यावर पहिल्या दहा लाख ग्राहकांना २०० रु सुट मिळेल.

Realme C21 : या फोनमध्ये 6.5″ HD+ LCD डिस्प्ले, 1600x720p रेजोल्यूशन, MediaTek Helio G35 प्रोसेसर, 3GB/4GB रॅम, 32GB/64GB स्टोरेज, 13MP+2MP+2MP कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 10W चार्जिंग, Android 10, फिंगरप्रिंट स्कॅनर अशा सुविधा मिळतील. या फोनची किंमत ७९९९ (3GB+32GB) आणि ८९९९ (4GB+64GB) इतकी आहे.

Realme C21 : या फोनमध्ये 6.5″ HD+ LCD डिस्प्ले, 1600x720p रेजोल्यूशन, MediaTek Helio G70 प्रोसेसर, 4GB रॅम, 64GB/128GB स्टोरेज, 13MP+2MP+2MP कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 6000mAh बॅटरी, 18W चार्जिंग, Android 11, फिंगरप्रिंट स्कॅनर, TÜV Rheinland certification अशा सुविधा मिळतील. या फोनची किंमत ९९९९ (4GB+64GB) आणि १०९९९ (4GB+128GB) इतकी आहे.

मध्यंतरी काही काळ बराच विरोध झाल्यानंतर चीनी फोन्सची विक्री भारतात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. रियलमी आणि शायोमीने अवघ्या काही दिवसातच बरेच पर्याय द्यायलासुद्धा सुरुवात केली आहे.


Exit mobile version